Kagal Crime | म्हाकवेत चोरांचा धुमाकूळ सुरूच, हनुमानाच्या मूर्तीच्या चांदीच्या मुकुटासह गदाही लंपास!

चोरट्यानी सीसीटीव्ही कॅमेरे बंद करून साधला डाव,
Kagal Crime | म्हाकवेत चोरांचा धुमाकूळ सुरूच, हनुमानाच्या मूर्तीच्या चांदीच्या मुकुटासह गदाही लंपास!
Kagal Crime | म्हाकवेत चोरांचा धुमाकूळ सुरूच, हनुमानाच्या मूर्तीच्या चांदीच्या मुकुटासह गदाही लंपास!
Published on
Updated on

म्हाकवे : म्हाकवे ता कागल येथे काल मध्यरात्री चोरट्यानी हनुमान मंदिरातील कुलूप तोडून मूर्तीवरील एक किलो चांदीचा मुकुट व पितळेची गदा लंपास केला. या चोरीमध्ये जवळपास दोन अडीच लाख रुपये किमतीचे वस्तू लंपास केले आहेत. गेले महिनाभर चोरांचा धमाका सुरूच असून परवाच रात्री नजीकच्या आप्पाचीवाडी येथे एका महिलेचे दोन तोळ्याचे गंठण लपास केली होते.

ही घटना ताजी असताना दुसऱ्या रात्री येथील हनुमान मंदिरात मध्यरात्री चोरट्यानी सीसीटीव्ही कॅमेरे बंद करून ग्रामपंचायत कार्यासमोर असलेल्या हनुमान मंदिरातील मूर्तीवरील एक किलो चांदीचा मुकुट व तीन किलो पितळेची गदा असा जवळपास दोन अडीच लाखाचा ऐवज लंपास केला आहे गेल्या महिन्याभरात ही चोरीची पाचवी घटना घडली आहे त्यामुळे ग्रामस्थात भीतीचे वातावरण आहे.

गेले तीन दिवस कागल पोलिसांची गस्त सुरू असतानाही चोरट्यानी भर बाजारपेठेत मंदिरातील मूर्तीवर डल्ला मारल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. चारच दिवसांपूर्वी हत्यार बंद चोरटे गावातील काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले होते. परंतु त्यांनी मास्क घातल्याने त्यांची ओळख पटत नव्हती आत्तापर्यंत झालेल्या चोऱ्या माळ वस्तीवर होत होत्या परंतु रात्री चोरट्याने भर बाजारपेठेत चोरी केल्याने ग्रामस्थात भीतीचे वातावरण आहे.

काही दिवसापूर्वी सिद्धाराम पाटील यांचे बंद घर फोडून एक तोळा दागिने लंपास केले होते तर विद्या पवार यांचे फिरायला गेले असताना अर्ध्या तोळ्याचे मंगळसूत्र लंपास केले होते. बाबुराव पाटील यांचे दुकान फोडून पाच हजार रुपये लंपास तर सुधाकर चौगुले यांची मोटरसायकल चोरट्याने लंपास केली होती 15 जुलै रोजी दोन बंद घरे पडण्याचा चोरट्याने प्रयत्न केला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news