Kolhapur News : कागलमध्ये साकारणार एक कोटी खर्चाचे नमो उद्यान

नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र; समरजित घाटगे, नगराध्यक्षा माने यांच्या हस्ते भूमिपूजन
Namo Udyan
कागलमध्ये साकारणार एक कोटी खर्चाचे नमो उद्यान
Published on
Updated on

कागल : कागल नगरपालिकेच्या वतीने वैशिष्ट्यपूर्ण योजना 2025-26 अंतर्गत शासन मंजूर निधी एक कोटी रुपये मधून विकसित करण्यात येणाऱ्या नमो उद्यान गार्डनच्या कामाचे भूमिपूजन शाहू ग््रुापचे अध्यक्ष समरजित घाटगे व नगराध्यक्षा सविता माने यांच्या हस्ते यांच्या हस्ते झाले.

गणेशनगर घरकूल नजीक सर्व्हे नंबर 423 पैकी ओपन स्पेस जागेमध्ये एक कोटी खर्चाचे वैशिष्ट्यपूर्ण नमो उद्यान उभारण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, उपनगराध्यक्ष जयवंत रावण, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, मुख्याधिकारी अजय पाटणकर, श्रीनाथ उद्योग समूहाचे संस्थापक चंद्रकांत गवळी, नवल बोते, राजे बँकेचे माजी अध्यक्ष राजेंद्र जाधव, संचालक रणजित पाटील, माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सौरभ पाटील, नगरसेवक अरुण गुरव, सारिका बारड, स्वरूपा जकाते, दीपक मगर, सतीश घाडगे, बाळासो माळी, अर्जुन नाईक, रजिया मुजावर, रंजना सणगर, मेघा माने, अमित पिष्टे, सुशांत कालेकर, सेबरनिदा मुश्रीफ, साधना पाटील, मीना लोटे, उमेश सावंत, सुमन गवळी, सुवर्णा पिष्टे, पूनम मोरे, संगीता रजपूत, आनंदराव पसारे, यांच्यासह बाळासाहेब नाईक, माजी नगराध्यक्ष अस्लम मुजावर, नवाज मुश्रीफ, बाळासाहेब हेगडे, दिनेश तिवारी, नगर अभियंता सुनील माळी, सचिन भोसले, राष्ट्रवादी शहराध्यक्ष संजय चितारी व इतर मान्यवर उपस्थित होते. ठेकेदार फिरोज मुल्ला यांनी स्वागत केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news