Kadvi Dam | कडवी मध्यम प्रकल्प दुसऱ्यांदा 'ओव्हरफ्लो'; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Kolhapur Rain | नदीपात्रात २२० क्युसेक विसर्ग सुरू
Kadvi Dam overflow
पाणलोट क्षेत्रात पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावलल्याने कडवी धरण दुसऱ्यांदा भरले आहे (Pudhari Photo)
Published on
Updated on

Kadvi Dam overflow Flood warning

सुभाष पाटील

विशाळगड : कडवी पाणलोट क्षेत्रात पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे निनाई परळे येथील कडवी मध्यम प्रकल्प दुसऱ्यांदा पूर्ण क्षमतेने भरला आहे. यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असून, प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

यापूर्वी हे धरण २४ जुलै रोजी 'ओव्हरफ्लो' झाले होते. त्यानंतर पावसाने थोडी उघडीप दिल्याने धरणातील पाणीसाठा ९६ टक्क्यांपर्यंत खाली आला होता. मात्र, गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सोमवारी सकाळी ६ वाजता हे धरण पुन्हा एकदा दुथडी भरून वाहिले.

Kadvi Dam overflow
Kolhapur Rains | पंचगंगा नदी पाचव्यांदा पात्राबाहेर; कोल्हापूर जिल्ह्याला रेड अलर्ट

सध्या विद्युत गृहातून २२० क्युसेक प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग कडवी नदीपात्रात होत आहे. यामुळे नदीची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता २.५१ टीएमसी असून, ७१. २४ दलघमी इतका पाणीसाठा आहे. गेल्या चोवीस तासांत धरण पाणलोट क्षेत्रात ८५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, या हंगामात आतापर्यंत एकूण २६३८ मिमी पाऊस झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस कमी असला, तरी धरणाने मात्र सलग दुसऱ्यांदा आपली क्षमता गाठली आहे.

धरणाची सद्यस्थिती :

* भरले : १०० % (२.५१ टीएमसी)

* पाणी पातळी : ६०१. २५ मीटर

* पाणीसाठा : ७१. २४ दलघमी

* पाण्याची आवक : २८९ क्युसेक

* पाण्याचा विसर्ग : २२० क्युसेक प्रतिसेकंद

* गेल्या २४ तासांत पाऊस : ८५ मिमी

* आजपर्यंतचा एकूण पाऊस : २६३८ मिमी.

* गतवर्षी याच दिवशी एकूण पाऊस : ३४०५ मिमी.

* प्रकल्पाची साठवण क्षमता : २.५१ टीएमसी.

कडवी मध्यम प्रकल्प दुसऱ्यांदा पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. आम्ही नदीकाठच्या लोकांना सावधतेचा इशारा दिला आहे. धरणस्थळी पर्यटकांना येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

- खंडेराव गाडे, शाखा अभियंता, कडवी धरण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news