JK India E Agritech Award: जेके इंडिया ई-ॲग्रीटेकला आंतरराष्ट्रीय पुरस्कार; श्रीलंकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांच्या हस्ते सन्मान

श्रीलंकेतील कोलंबो येथे ग्लोबल ब्रँड अवॉर्ड्समध्ये पुरस्कार प्रदान; साखर आणि कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानाधारित कार्याची जागतिक स्तरावर दखल
JK India E Agritech Award
JK India E Agritech AwardPudhari
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर: भारतातील साखर आणि कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या जेके इंडिया ई-ॲग्रीटेक लिमिटेड या कंपनीने आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे यश मिळवले आहे. कंपनीला ‘इंडियाज लार्जेस्ट शुगर अँड ॲग्री व्हॅल्यू चेन’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. श्रीलंकेतील कोलंबो येथे झालेल्या ग्लोबल ब्रँड अवॉर्ड्सच्या तिसऱ्या पर्वात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्रीलंकेचे माजी राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाल सिरिसेना यांच्या हस्ते कंपनीला हा सन्मान देण्यात आला.

३० ऑक्टोबर २०२६ रोजी कोलंबो येथील पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या ‘टेम्पल ट्रीज’ येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी श्रीलंकेतील नेपाळ दूतावासाचे उपप्रमुख विजय कुमार राऊत उपस्थित होते. कंपनीच्या वतीने अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक उप्पल शाह, संचालक हेमंतकुमार शाह आणि संचालक हुसेन गांगडीवाला यांनी पुरस्कार स्वीकारला.

कंपनीच्या तंत्रज्ञानावर आधारित व्यवसाय पद्धतीची या पुरस्कारासाठी विशेष दखल घेण्यात आली. साखरेची खरेदी-विक्री अधिक सोपी आणि पारदर्शक करण्यासाठी कंपनीने ‘ईबायशुगर’ हे डिजिटल व्यासपीठ सुरू केले आहे. या माध्यमातून साखर खरेदीदार आणि विक्रेते एकमेकांशी जोडले जातात. तसेच व्यापारासाठी आवश्यक असलेल्या लॉजिस्टिक्स आणि विमा सेवाही उपलब्ध करून दिल्या जातात. याशिवाय साखर उद्योगातील बातम्या आणि व्यावसायिक संपर्कासाठी ‘चिनीमंडी’, तर कृषी उत्पादनांचे संशोधन आणि मार्गदर्शनासाठी ‘ॲग्रीमंडी’ ही व्यासपीठे सुरू करण्यात आली आहेत.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर उप्पल शाह यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, "आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेला हा पुरस्कार आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. साखर उद्योगाशी आमचे अनेक वर्षांपासूनचे नाते आहे. या काळात तंत्रज्ञानाचा वापर, माहिती सहज उपलब्ध करून देणे आणि बाजारपेठांशी व्यावसायिक जोडणी मजबूत करणे यावर आम्ही भर दिला आहे. पारंपरिक उद्योगांमधील विश्वास आणि जुनी नाती कायम ठेवून तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रगती करता येते, यावर आमचा विश्वास आहे. या पुरस्कारामुळे भविष्यातही साखर आणि कृषी क्षेत्रात नवे उपक्रम राबवण्याची प्रेरणा मिळाली आहे."

जेके इंडिया ई-ॲग्रीटेकची सुरुवात शाह कुटुंबाने १९८१ मध्ये भारतातील साखर व्यापार क्षेत्रातून केली. गेल्या चार दशकांहून अधिक काळातील अनुभवाच्या जोरावर कंपनीने व्यवसायाचा विस्तार केला आहे. पारंपरिक साखर व्यापाराला डिजिटल तंत्रज्ञानाची जोड देत कंपनीने खरेदीदार, विक्रेते आणि इतर व्यावसायिकांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न केला आहे.

दुसऱ्या पिढीतील उद्योजक उप्पल शाह आणि हेमंत शाह यांच्या नेतृत्वाखाली कंपनीची वाटचाल सुरू आहे. पारंपरिक व्यवसायातील अनुभव आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा मेळ घालून साखर तसेच कृषी क्षेत्रात अधिक चांगल्या संधी निर्माण करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. या आंतरराष्ट्रीय पुरस्कारामुळे कंपनीच्या कामाची जागतिक स्तरावर दखल घेतली गेली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.