Jewellery Shop Theft | चैनीसाठी सराफ दुकान फोडले; एकास अटक

४ लाखांचा मुद्देमाल जप्त; उजळाईवाडी येथील चोरीचा छडा
Jewellery theft arrest |
Jewellery Shop Theft | चैनीसाठी सराफ दुकान फोडले; एकास अटकFile Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : उजळाईवाडी (ता. करवीर) येथील सराफ दुकानातील चोरीचा छडा लावण्यात स्‍थानिक गुन्हे अन्वेषणला यश आले. याप्रकरणी आकाश सगन राठोड (वय २०, रा. माळवाडी, शिरोली पुलाची, ता. हातकणंगले) याला अटक केले असून, साथीदार आदिनाथ संजय नरसिंगे (रा. शिरोली पुलाची) याचा पोलिस शोध घेत आहेत. त्‍याच्याकडून सोन्‍या-चांदीच्या दागिन्यांसह एक मोटार असा ४ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. चैनीसाठी दोघांनी ही धाडसी चोरी केल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

फिर्यादी प्रवीण रूपाराम माळी (रा. लक्ष्मीपुरी) यांचे उजळाईवाडी येथे ज्वेलर्स दुकान आहे. शनिवारी (दि. ३०) मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाच्या शटरचे कुलूप कापून चोरी केली होती. सोन्‍या- चांदीच्या दागिन्‍यांसह इमिटेशन ज्‍वेलरी लंपास केली. याप्रकरणी गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल केला होता. स्‍थानिक गुन्‍हे अन्वेषणचे पोलिस अंमलदार रोहित मर्दाने यांना एका सीसीटीव्‍ही फुटेजमधून ही चोरी आकाश व आदिनाथ यांनी केल्‍याची माहिती समोर आली.

आकाश चोरीचे दागिने विक्रीसाठी शिये फाटा येथे येणार असल्‍याची माहिती मिळाली. यानुसार मंगळवारी (दि. २) शिये फाटा परिसरात सापळा रचून त्‍याला अटक केली. त्याच्याकडून चांदीचे दागिने, चांदीची गणपती मूर्ती, १ ग्रॅम सोन्याची चैन, ब्रेसलेट, लहान मंगळसूत्र, नेकलेस तसेच ग्रायंडर मशिन असा ४ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्‍या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार राजू कोळी, योगेश गोसावी, समीर कांबळे, सतीश जंगम, अमित सर्जे, शुभम संकपाळ, सतीश सूर्यवंशी यांनी केली.

नरसिंगे सराईत गुन्‍हेगार

आदिनाथ नरसिंगे याच्‍यावर या पूर्वी दोन घरफोडीचे गुन्‍हे दाखल आहेत. तसेच, चार दिवसांपूर्वी सादळे-मादळे येथील खूनप्रकरणी तो पेठवडगाव पोलिसांच्‍या अटकेत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news