Gold Jewellery Fraud | सोन्याचे दागिने करून देण्याच्या बहाण्याने सराफ व्यावसायिकाची २ कोटींची फसवणूक

Gold Jewellery Fraud |
Gold Jewellery Fraud | सोन्याचे दागिने करून देण्याच्या बहाण्याने सराफ व्यावसायिकाची २ कोटींची फसवणूक
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : सोन्याचे मणी घेऊन दागिने आणि ते गाठवून देण्याच्या बहाण्याने सराफ व्यावसायिकाचे ३ किलो १५६ ग्रॅम सोने तसेच ४१ लाख रुपये घेऊन २ कोटी ३१ लाख ६५ हजारांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यास जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. किरण तेजराज जैन ऊर्फ राठोड (वय ५१, रा. बंधन सेरेसिटी, मंगळवार पेठ) असे त्याचे नाव आहे. २३ जानेवारी २०२३ ते १५ जून २०२३ या कालावधीत ही घटना घडली.

Summary

* तीन किलो सोने, ४१ लाख रुपये परत देण्यास टाळाटाळ

* व्यापाऱ्यास अटक; जुना राजवाडा पोलिसांची कारवाई

फिर्यादी हर्षद रमणलाल परमार यांनी जानेवारी २०२३ ते जून २०२३ या कालावधीत किरण जैन-राठोडला दागिने बनविण्यासाठी तीन किलो १५६ ग्रॅम २२ कॅरेटचे सोने दिले होते. याचे दागिने बनवून देण्यास किरणने टाळाटाळ सुरू केली. २०१८ ते २०२३ या कालावधीत परमार आणि राठोड यांच्यात झालेल्या विविध व्यवहारांतील ४१ लाख ६५ हजार रुपयांची रक्कमही देण्यास किरण राठोड याने टाळाटाळ सुरु केली. अखेर हर्षद परमार यांनी पोलिसांत धाव घेऊन राठोडविरोधात तक्रार दिली.

याची खातरजमा करून २ कोटी ३१ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा किरण जैन ऊर्फ राठोड याच्यावर दाखल केला. संशयित किरण जैन याला मंगळवारी रात्री अटक करून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी कारागृहात केली. अटकेची कुणकुण लागताच किरण जैन छातीत दुखत आहे, असा कांगावा करीत होता; मात्र त्याला अटक झालीच. किरण जैन याने परमार यांना विविध कारणे देऊन सोने आणि पैसे देण्यास टाळाटाळ केली. २३ मे २०२६ मध्ये जैनने नोटरीद्वारे करून सोने आणि पैसे परत देण्याचे कबूल केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.