Jayant Patil| केंद्राने दडपशाहीचा कळस गाठला

जयंत पाटील : महाविकास आघाडीच्या प्रचाराचा कोल्हापुरातून शुभारंभ
Jayant Patil
Jayant Patil
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : केंद्र सरकारने विविध आंदोलने आणि चळवळी दडपशाहीच्या माध्यमातून मोडून काढण्याचा कळस गाठला आहे. देशात सध्या सरकारच्या धोरणांविरोधात अनेक घटक रस्त्यावर उतरत आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी रविवारी येथे केले.

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे शिक्षक मतदारसंघातील उमेदवार प्रा. जयंत आसगावकर आणि पदवीधर मतदारसंघातील उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव यांच्या प्रचारार्थ काँग्रेस कमिटी येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, आमदार सतेज पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आदी उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले, देशातील परिस्थिती बदलत आहे. सरकारची धोरणे मान्य नसलेले अनेक घटक आंदोलनाच्या माध्यमातून आपला विरोध व्यक्त करीत आहेत. या पार्श्वभूमीवर होत असलेल्या निवडणुकीतील मतदार खऱ्या अर्थाने सुशिक्षित असून, त्याला देशातील परिस्थितीची जाणीव आहे. या वातावरणाचा फायदा महाविकास आघाडीला होईल. शशिकांत शिंदे म्हणाले, नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या नगरीतून महाविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ होत आहे. त्यामुळे आता चिंता करण्याचे कारण नाही.

आमदार सतेज पाटील म्हणाले, महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करण्याची माझी भूमिका स्पष्ट आहे. मी आघाडीच्याच उमेदवारांसाठी प्रचार करणार आहे. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, राजू शेट्टी, माजी आमदार मालोजीराजे, शिक्षक मतदारसंघातील उमेदवार प्रा. जयंत आसगावकर आणि पदवीधर मतदारसंघातील उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.

मेळाव्याला माजी आमदार ऋतुराज पाटील, राजू आवळे, राजीव आवळे, व्ही. बी. पाटील, दिलीप पोवार, उदय नारकर, बाबुराव कदम, मेहबूब शेख, सारंग श्रीनिवास पाटील, प्रभाकर देशमुख, शशांक बावचकर, सरलाताई पाटील, मदन कारंडे, महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रवीण केसरकर, गटनेते इंद्रजित बोंद्रे, तौफिक मुल्लाणी, सतीशचंद्र कांबळे, अनिल घाटगे, प्राचार्य टी. एस. पाटील आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news