Kolhapur News | अध्‍यक्ष भाजपचा, फिल्डिंग मात्र जनसुराज्‍यची

Kolhapur News
Kolhapur News | अध्‍यक्ष भाजपचा, फिल्डिंग मात्र जनसुराज्‍यचीfile photo
Published on
Updated on

कोल्‍हापूर : शेतकरी सहकारी संघाचे अध्‍यक्षपद भाजपच्‍या संचालकास मिळण्‍यासाठी जनसुराज्‍यच्‍या दोन संचालकांची धावपळ सुरू आहे. इच्‍छुकास घेऊन त्‍यांनी नेत्‍यांच्‍या भेटीगाठी सुरू केल्‍या आहेत. काँग्रेसचेही दोन संचालक इच्‍छुक असून त्‍यांच्‍याकडूनही आमदार सतेज पाटील यांच्‍याकडे अध्‍यक्षपदासाठी फिल्डिंग लावली जात आहे.

शेतकरी संघाला ऊर्जितावस्‍था देण्‍यासाठी जिल्‍ह्यातील सर्वपक्षीय नेत्‍यांनी एकत्रित येत निवडणूक बिनविरोध करण्‍याचा प्रयत्‍न यशस्‍वी झाला नाही; पण निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनेलला एकहाती सत्ता मिळाली. त्‍यानंतर प्रत्‍येक पक्षाला एक वर्ष अध्‍यक्षपद देण्‍याचा फॉर्म्युला ठरला. पहिल्‍यांदा राष्‍ट्रवादी, नंतर जनसुराज्‍यला अध्‍यक्षपद मिळाले. आता भाजप आणि काँग्रेसमध्‍ये रस्‍सीखेच सुरू आहे. अध्‍यक्षपदासाठी भाजपकडून अजितसिंह मोहिते आणि ॲड. दत्तात्रय राणे, तर काँग्रेसकडून आनंदा बनकर आणि दत्ताजीराव वारके इच्छुक आहेत. बनकर व वारके यांच्‍याकडून आ. सतेज पाटील यांच्यांकडे प्रयत्‍न सुरू आहेत. भाजपच्‍या एका इच्‍छुकाची अध्‍यक्षपदी वर्णी लावण्‍यासाठी जनसुराज्‍य शक्‍ती पक्षाच्‍या दोन संचालकांचे प्रयत्‍न सुरू आहेत. या संचालकांचा पुढाकार सध्‍या चर्चेचा विषय ठरला आहे. भाजपचे संबंधित इच्छुक अन्‍य संचालकांना विचारात न घेता नेत्‍यांच्‍या गाठीभेटी घेत असल्‍याने संचालक नाराज आहेत.

निवडीसाठी मंगळवारी बैठक

अध्‍यक्ष निवड मंगळवारी (दि. ९) होणार आहे. त्‍यामुळे अध्‍यक्षपद भाजपला द्यायचे का काँग्रेसला, यासाठी नेत्‍यांची आज किंवा उद्या बैठक होण्‍याची शक्‍यता आहे. बैठकीमध्‍ये ज्‍या पक्षाकडे अध्‍यक्षपद जाणार, त्‍या पक्षाचे नेते अध्‍यक्षपदासाठीचे नाव निश्‍चित करणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news