

पुढारी ऑनलाईन डेस्क : करवीर मतदार संघातील जनसुराज्य पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावर रविवारी रात्री जीवघेणा हल्ला झाला. प्रचारसभा आटोपून येत असताना मनवाडजवळ ६ ते ७ हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक करून धारदार शस्त्राने हल्ला केला. यामध्ये ते जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे.
हल्लेखोरांनी संताजी घोरपडे यांचे वाहन आडवून काठी आणि धारदार शस्त्राने वार केला. हल्ल्यानंतर हल्लेखोर गाडीवर दगडफेक करून शेतवडीतून पसार झाले. यामध्ये घोरपडे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे. संताजी यांना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी कळे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केलेला आहे. हल्लेखोर कोण होते? त्यांनी हल्ला का केला? यासर्व बाबींचा तपास कळे पोलीस करत आहेत.