

कोल्हापूर : शेती उत्पन्न बाजार समितीच्या श्री शाहू मार्केट यार्ड येथे दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर बाबूराव अतितकर यांच्या अडत दुकानात गुळाचे सौदे काढण्यात आले. मुहूर्ताच्या सौद्यात तळाशी येथील शेतकरी लालासो बिरांडे यांच्या ५१ रवे गुळाला प्रतिक्विंटल ७,०११ रुपये इतका उच्चांकी दर मिळाला. हा गूळ व्यापारी शिवगोंडा सदलगे यांनी खरेदी केला.
यावेळी बाजार समितीचे सभापती प्रा. शेखर देसाई, उपसभापती पांडुरंग काशिद, ॲड. प्रकाश देसाई, भारत पाटील (भुयेकर), शंकर पाटील, संभाजी पाटील (पैलवान), सुयोग वाडकर, कुमार आहुजा, आकाराम केसरे (पैलवान), समितीचे सचिव तानाजी दळवी, उपसचिव वसंत पाटील, जीवन जाधव, शाहूपुरी मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष बाबासो पाटील (वडणगेकर), उपाध्यक्ष प्रवीण लिगाडे यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, शेतकरी, अडते, व्यापारी, हमाल, तोलाईदार आदी उपस्थित होते.