मुगळी येथील जॅकवेल जमिनीत खचले: ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाई भेडसावणार

Kolhapur Jackwell Collapse | आज पहाटे घटना उघडकीस
Jackwell Collapse in Mugli  village
चिकोत्रा काठावर जॅकवेलचे उरलेले अवशेषPudhari Photo
Published on
Updated on

माध्याळ: पुढारी वृत्तसेवा: मुगळी (ता. कागल) गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी चिकोत्रा नदीवर उभारलेले जॅकवेल आज (दि.१७) पहाटे खचले. 40 फूट उंचीचे गोलाकार जॅकवेल नदीकाठावर खचले. ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीला ही घटना आज पहाटे समजली. कर्मचारी तानाजी कांबळे यानी गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी विद्युतपंप चालू केला. मात्र, सार्वजनिक नळाला पाणी आले नाही, नदीवर प्रत्यक्ष पाहणी केली असता जॅकवेल भुईसपाट झाल्याचे व दगड, वाळू इतस्ततः दिसून आले. सुदैवाने दिवसा घटना घडली नाही, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. (Kolhapur Jackwell Collapse)

यामुळे 14 लाखांचे नुकसान झाले आहे. कडक उन्हाळ्यात घडलेल्या या घटनेने मुगळीकरांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार आहे. या पाणी योजनेची उभारणी 1990 साली करण्यात आली. त्या काळात जॅकवेल उभारणीसाठी 12 लाख खर्च करण्यात आला. दगड, सिंमेंट, वाळू चा वापर करुन उभारणी करण्यात आली. पाया भरभक्कम दगडी करण्यात आला. मात्र 35 वर्षाचा कालावधी लोटल्यानंतर जॅकवेलचे दगडी बांधकाम निसटू लागले. रेगूर मृदा एका बाजूला असल्याने व पाया कमकुवत झाल्याने घटना घडल्याचे बोलले जाते.

दरम्यान, घटनेचा पंचनामा सरपंच मेघा पाटील, उपसरपंच उदय पसारे, ग्रामसेवक अमोल चिखलीकर यांनी केला. पाणी पुरवठा विभागाने जलजीवन योजनेतून 15 अश्वशक्तीचे पंप नदीवर जोडून तात्पुरता थेट पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगितले. सरपंच, उपसरपंच यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य अभियंता यांनी दखल घेऊन नवीन जॅकवेलला मंजुरी देण्याची मागणी केली आहे. लोकप्रतिनिधींनी याबाबत पाठपुरावा करण्याची मागणी होऊ लागली आहे.

Jackwell Collapse in Mugli  village
कोल्हापूर : उकाड्यामुळे विजेची मागणी 300 मेगावॅटने वाढली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news