

कोल्हापूर : आयटीआयच्या विविध अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना शुक्र वार (दि. 27 जून) पर्यंत प्रवेश अर्ज निश्चित करता येणार आहेत. त्यानंतर शनिवारी (दि. 28 जून) प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.
शहरासह जिल्ह्यातील शासकीय 12 व खासगी 42 आयटीआयसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. कोल्हापुरातील शासकीय आयटीआय कोल्हापूर येथे 1388 प्रवेश जागांसाठी प्रक्रिया राबविली जात आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. http:/// admission. dvet. gov. in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यानुसार पहिली फेरीसाठी जिल्ह्यातील सर्व आयटीआयमध्ये प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. 27 जूनपर्यंत अर्ज निश्चितीची प्रक्रिया चालणार आहे, अशी माहिती शासकीय आयटीआयचे प्राचार्य महेश आवटे यांनी दिली.
पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प सादर करणे- 26 ते 28 जून
प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर होणार- 28 जून
गुणवत्ता यादीबाबत हरकती नोंदवणे- 29 व 30 जून
अंतिम गुणवत्ता यादी जाहीर- 1 जुलै
पहिली प्रवेश फेरी- 7 ते 12 जुलै
दुसरी प्रवेश फेरी- 8 ते 22 जुलै
तिसरी प्रवेश फेरी- 18 ते 27 जुलै
चौथी प्रवेश फेरी- 28 जुलै ते 10 ऑगस्ट
संस्थास्तरीय समुपदेश फेरी-11 ऑगस्ट