कोल्हापूर : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून मुलाखती

समरजित घाटगे, ए. वाय. पाटील, व्ही. बी. पाटील, नंदाताई बाभुळकर, मधुकर जांभळे, मदन कारंडे, संजय तेलनाडे इच्छुक
sharad pawar
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून मुलाखती.Pudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीची तयारी सर्व पक्षांकडून सुरू असून, आता उमेदवार निश्चितीची प्रक्रिया सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून मंगळवारी समरजित घाटगे, ए. वाय. पाटील, व्ही. बी. पाटील, नंदाताई बाभुळकर, मधुकर जांभळे, मदन कारंडे, संजय तेलनाडे आदी इच्छुकांनी मुलाखती दिल्या.

राष्ट्रवादीतर्फे जिल्ह्यातून विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असणार्‍या उमेदवारांच्या मुलाखती मंगळवारी पुणे येथे घेण्यात आल्या. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खा. सुप्रिया सुळे, खा. अमोल कोल्हे, खा. धैर्यशील मोहिते-पाटील, खा. फौजिया खान, आ. रोहित पवार, आ. बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे, माजी खा. वंदना चव्हाण यांच्या उपस्थितीत या मुलाखती झाल्या.

जिल्ह्यातून विधानसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर उत्तरसाठी इच्छुक असणारे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, चंदगडमधून डॉ. नंदाताई बाभुळकर-कुपेकर व अमरसिंह चव्हाण, राधानगरी-भुदरगडमधून ए. वाय. पाटील, संतोष मेघाणे व डॉ. नवज्योतसिंह देसाई, कागलमधून समरजित घाटगे, इचलकरंजीमधून माजी आमदार अशोकराव जांभळे, मदन कारंडे, सुहास जांभळे, संजय तेलनाडे, तर शिरोळमधून स्नेहा देसाई यांच्या मुलाखती झाल्या.

कोल्हापूरमधून शहराध्यक्ष आर. के पोवार, कार्याध्यक्ष अनिल घाटगे, प्रदेश प्रवक्ते राजीव आवळे, रामराजे कुपेकर, गडहिंग्लज तालुकाध्यक्ष शिवाजी माने, भुदरगड तालुकाध्यक्ष धनराज चव्हाण, वसंतराव देसाई आदी उपस्थित होते.

इचलकरंजीतून सर्वाधिक इच्छुक

कोल्हापूर उत्तर, चंदगड, राधानगरी-भुदरगड, कागल, इचलकरंजी व शिरोळ विधानसभा मतदारसंघांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने दावा केला आहे. यामध्ये इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक चौघांनी उमेदवारीची मागणी केली आहे. त्यापाठोपाठ राधानगरीतून तिघांनी उमेदवारीची मागणी केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news