Ambabai temple conservation | अंबाबाई मंदिर संवर्धनातील शिलालेखांचा अर्थ उलगडणार

तज्ज्ञांकडून होणार मजकूर, कालखंड, वैशिष्ट्यांचा अभ्यास
Ambabai temple conservation
कोल्हापूर : 64 योगिनी मूर्तीच्या पायथ्याशी आढळलेला शिलालेख व ओवर्‍यांमध्ये सापडलेल्या काही प्राचीन मूर्ती. (छाया ः पप्पू अत्तार)
Published on
Updated on

अनुराधा कदम

कोल्हापूर : अंबाबाई मंदिर विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत सुरू असलेल्या संवर्धन कामांदरम्यान मंदिर परिसरात प्राचीन शिलालेख, दुर्मीळ मूर्ती आणि ऐतिहासिक अवशेष आढळून आले आहेत. या सर्व अवशेषांचे आता वैज्ञानिक पद्धतीने सर्वेक्षण करण्यात येणार असून त्यातून मंदिराच्या इतिहासातील अनेक नवे संदर्भ समोर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मंदिरातील 64 योगिनी मूर्तींच्या पायथ्याशी काही प्राचीन शिलालेख आढळले आहेत. त्यावरील मजकूर, कालखंड आणि स्थापत्य वैशिष्ट्यांचा अभ्यास तज्ज्ञांकडून केला जाणार आहे. तसेच मंदिर परिसरातील ओवर्‍यांमध्ये काही प्राचीन मूर्तीही सापडल्या आहेत. त्यापैकी काही मूर्ती जैन यक्ष-यक्षिणी स्वरूपातील असाव्यात, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

सध्या मंदिराचा गाभारा आणि आतील भाग मूळ दगडी स्वरूपात आणण्याचे काम सुरू आहे. जुने थर संवर्धनपूर्वक हटवून मूळ स्थापत्य जतन करताना जुनी फरशी काढून पारंपरिक दगडी फरशी बसविण्याचे कामही सुरू आहे. मंदिर संवर्धनाच्या कामामुळे कोल्हापूरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचे अनेक अज्ञात पैलू पुढे येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

अंबाबाई मंदिर विकास प्रकल्प द़ृष्टिक्षेपात

पहिल्या टप्प्यासाठी 143 कोटी मंजूर निधी

पुरातत्त्व विभागाच्या पाहणीनुसार काम

गाभारा आणि अंतर्गत भागाचे मूळ स्वरूप

जतन करण्यावर भर

दगडी फरशी, संवर्धन, प्रकाशयोजना यांचा समावेश

शिलालेख आणि मूर्तींचे स्वतंत्र सर्वेक्षण सुरू उन्हाळी सुट्टीमध्ये अंबाबाई दर्शनाला पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे काही ठिकाणची कामे प्रलंबित आहेत. ही सर्व कामे तातडीने पूर्ण केली जाणार आहेत. स्वच्छतेची कामे पूर्ण झाली आहेत. तेथील संवर्धनाची कामे त्वरित करण्यावर भर आहे.

विलास वहाणे, सहायक संचालक, पुरातत्त्व विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news