

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या तिजोरीची चावी असलेल्या स्थायी समितीसाठीच्या सदस्यांची लॉटरी अखेर शुक्रवारी (दि. 20) फुटली. काँग््रेासकडून गटनेते इंद्रजित बोंद्रे, प्रवीण केसरकर, ठाकरे गटाच्या प्रतिज्ञा उत्तुरे, भाजपचे विशाल शिराळे, राष्ट्रवादीचे आदिल फरास यांच्यासह 16 सदस्यांची निवड करण्यात आली.
दरम्यान, परिवहन समितीच्या 12 आणि महिला व बालकल्याण समितीच्या 9 सदस्यांच्याही निवडी झाल्या. स्थायी समिती सदस्यपदासाठी बोंद्रे, केसरकर, उत्तुरे, प्रताप जाधव, अमर समर्थ, सुभाष बुचडे, प्रवीण सोनवणे या सातजणांची निवड करण्यात आली. भाजपकडून विशाल शिराळे, राजनंदा महाडिक, नेहा तेंडुलकर, अभिजित मोकाशी, पूर्वा राणे यांची शिवसेनेकडून अर्चना पागर, शीला सोनुले, अनुराधा खेडकर तर राष्ट्रवादीकडून आदिल फरास यांची निवड झाली. दरम्यान, काँग््रेासने स्थायी, परिवहनसह इतर सदस्यांची नावे गुप्त ठेवली होती. आमदार सतेज पाटील यांनी तानाजी लांडगे यांच्याकडून बंद पाकीट पाठविले. त्यात सदस्यांच्या निवडीची नावे होती.
परिवहन समितीसाठी काँग््रेासकडून दुर्वास कदम, उमेश पोवार, महेंद्र कोरडे, श्रीधर गाडगीळ, अक्षय शेळके, भाजपकडून प्रसाद जाधव, हेमंत आराध्ये, संतोष लाड, प्रशांत मोरे, शिवसेनेकडून सत्यजित जाधव, रोहन अतिग््रेा, राष्ट्रवादीकडून मानसी लोळगे यांच्या निवडी झाल्या. महिला व बालकल्याण समितीत काँग््रेासच्या अरुणा गवळी, धनश्री कोरवी, अनुराधा मुळीक, जयश्री कांबळे, भाजपच्या वंदना मोहिते, नीलिमा पाटील, दीपा ठाणेकर, शिवसेना - प्राजक्ता जाधव, कौसर बागवान यांच्या निवडी करण्यात आल्या.