kolhapur | इथेनॉल देईल साथ, फ्लेक्स इंजिन करेल टंचाईवर मात

देशात इथेनॉलनिर्मिती दुपटीने वाढवण्याची गरज; वाहन उद्योग फ्लेक्स क्रांतीच्या प्रतीक्षेत
kolhapur | इथेनॉल देईल साथ, फ्लेक्स इंजिन करेल टंचाईवर मात
kolhapur | इथेनॉल देईल साथ, फ्लेक्स इंजिन करेल टंचाईवर मात
Published on
Updated on

तानाजी खोत

कोल्हापूर : मध्य पूर्वेतील युद्धामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळी ठप्प झाल्याने कच्च्या तेलाचे दर प्रतिबॅरल 110 डॉलरच्या पार गेले आहेत. जगभरात इंधन टंचाईचे संकट गडद झाले असताना भारताला या संकटातून वाचवू शकणारी 1000 कोटी लिटर अतिरिक्त इथेनॉलनिर्मितीची क्षमता वापरली जात नाही. हे ‘स्वदेशी इंधन’ आता भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी गेम चेंजर ठरू शकते; पण त्यासाठी सरकारने तातडीने धोरणात्मक पावले उचलण्याची गरज उद्योग क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

20 टक्क्यांच्या मर्यादेचा अडसर

पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रणाचे ठेवलेले उद्दिष्ट 1 एप्रिलपूर्वी पूर्ण झाले आहे. देशाची एकूण इथेनॉल उत्पादन क्षमता 2,000 कोटी लिटर झाली आहे; मात्र 1,100 कोटी लिटरच इथेनॉल वापरात येत आहे. उर्वरित 50 टक्के इथेनॉल क्षमता असूनही ते तयार होत नाही. कारण, बाजारात इथेनॉलला उठाव नाही. सध्याच्या गाड्या 20 टक्क्यांहून अधिक इथेनॉल मिश्रण सहन करू शकत नाहीत.

फ्लेक्स इंजिन म्हणजे काय?

ही कोंडी फोडण्यासाठी सरकारने इ-22 वाहन म्हणजे 22 टक्के मिश्रणाला परवानगी द्यावी. त्यामुळे कोणतेही मोठे बदल न करता 22 टक्के इथेनॉल वापरता येईल. दीर्घकालीन उपाय म्हणून फ्लेक्स फ्युएल वाहनांना चालना हे या समस्येवरील कायमस्वरूपी उत्तर ठरेल, असे भारतीय साखर उत्पादक संघटनेने (इस्मा) सरकारला कळवले आहे. फ्लेक्स म्हणजे अशी वाहने, जी 100 टक्के पेट्रोल किंवा 100 टक्के कोरे इथेनॉल (ए 100) अशा कोणत्याही मिश्रणावर चालू शकतात.

फ्लेक्स वाहने बाजारात

मारुती सुझुकी (फ्राँक्स), टोयोटा (इनोव्हा हायक्रॉस), टाटा मोटर्स पंच आणि अल्ट्रोझ मॉडेल्स ही फ्लेक्स वाहने लाँचच्या तयारीत आहेत. टीव्हीएसने अपाचे आणि बजाजने पल्सरचे फ्लेक्स मॉडेल बाजारात आणले आहेत. या गाड्यांच्या इंजिनमध्ये खास फ्युएल सेन्सर आणि गंजरोधक साहित्य वापरले जाते, जे इथेनॉलच्या गुणधर्मांशी जुळवून घेते. फ्लेक्स वाहनांवरील जीएसटी 18 टक्क्यांवरून 5 टक्क्यांवर आणून त्यांना प्रोत्साहन द्यावे. कारण, पेट्रोल 110 रुपये असताना कोरे इथेनॉल ग्राहकांना 80 ते 82 रुपयांत पडू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news