kolhapur | विहिरीत सूर मारला... अन् जीवास मुकला!

इंचनाळमधील तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू
Inchanal drowning case |
kolhapur | विहिरीत सूर मारला... अन् जीवास मुकला!
Published on
Updated on

गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्यातील इंचनाळ येथे विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. गणेश बबन नांदवडे (वय 22) असे नाव आहे.

गणेश हा प्रणव पाटील व ओमकार पाटील (दोघेही रा. इंचनाळ) या मित्रांसमवेत दुपारी बळवंत पाटील यांच्या मालकीच्या विहिरीवर अंघोळीसाठी गेला होता. गणेशने विहिरीच्या काठावरून पाण्यात सूर मारण्यासाठी उडी घेतली. मात्र, त्यानंतर तो वर आलाच नाही. त्याचा बुडून मृत्यू झाला. तातडीने त्याचा शोध घेण्यात आला. पाच तास शोधमोहीम केल्यानंतर मृतदेह हाती लागला. त्याच्या पश्चात आई, वडील व विवाहित बहीण असा परिवार आहे.

पोलिस भरती स्वप्न अधुरे

गणेशने बीएस्सी अंतिम वर्षाची परीक्षा दिली होती. शरीरयष्टी चांगली असल्याने त्याचे पोलिस भरती होण्याचे स्वप्न होते. यासाठी तो गेल्या काही दिवसांपासून तयारी करत होता. त्याच्या मृत्यूने पोलिस भरतीचे स्वप्न अधुरे राहिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news