kolhapur | ‘सीपीआर’च्या पाच विभागांचे आज लोकार्पण

वैद्यकीय शिक्षणमंत्री मुश्रीफ यांची उपस्थिती; अधिष्ठाता डॉ. मोरे यांचा सत्कार
inauguration of five CPR departments today
कोल्हापूर : नवजात बालकांचा अत्याधुनिक अतिदक्षता विभाग.Pudhari File Phto
Published on
Updated on

कोल्हापूर : ‘सीपीआर’ येथील विविध इमारतींच्या नूतनीकरणाची कामे सुरू आहेत. टप्प्याटप्प्याने कामे झालेल्या विभागांचे लोकार्पण केले जात आहेत. रविवारी येथील पाच विभागांचे लोकार्पण सोहळा वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार आहे. तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार सोहळ्याचे आयोजन केले. दुपारी 4 वाजता हा कार्यक्रम सीपीआर येथे होणार आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली.

मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते नवजात बालकांचा अतिदक्षता विभाग 40 बेड, कासारी इमारतीवरील बधिरीकरण विभाग, आर्थेपेडिक विभाग, त्वचारोग विभाग, कान-नाक-घसा शस्त्र विभागातील प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि कर्मचार्‍यांसाठी स्वतंत्र कार्यालय, कृष्णा इमारतीमधील क्षयरोग विभाग, बर्न विभाग आणि परिसरातील इमारतींवर रुग्णांच्या नातेवाईकांसाठी उभारण्यात आलेल्या निवाराशेड आदींचे लोकार्पण होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news