राजकोट येथील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी डॉ. चेतन पाटील जेरबंद

Dr. Chetan Patil | मनुष्यवधासह शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा
Raids to trace construction consultant Dr. Chetan Patil
डॉ. चेतन पाटील Pudhari File Photo
Published on
Updated on

पुढारी वृत्तसेवा

बांधकाम सल्लागार डॉक्टर चेतन एस पाटील (राहणार शिवाजी पेठ कोल्हापूर) याला मध्यरात्री स्थानिक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून ताब्यात घेण्यात आले आहे. राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी बांधकाम सल्लागार असलेल्या डॉक्टर चेतन पाटील याच्यावर मालवण पोलीस ठाण्यात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल झाला होता.

चेतन पाटील याच्या अटकेसाठी मालवणचे पोलीस पथक चार दिवसापासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात ठाण मांडून होते. मात्र याला आज मध्यरात्री तीन वाजता कोल्हापूरातुन ताब्यात घेण्यात आले आहे.

गुरुवारी सायंकाळपर्यंत त्याचा मागमूस लागला नव्हता. दरम्यान, संयुक्त पोलिस पथकाने डॉ. चेतन पाटील याची पत्नी, वृद्ध आईसह त्याच्या काही मित्रांकडेही संपर्क साधून चौकशी केली होती. राजकोट येथील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सोमवार (दि. 26) दुपारपासून डॉ. चेतन पाटील याचा मोबाईल स्वीच ऑफ होता.

दोन्हीही मोबाईल स्वीच ऑफ

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण पोलिस, सिंधुुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण, कोल्हापूर पोलिस दलांतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण व जुना राजवाडा पोलिसांचे संयुक्त पथक डॉ. चेतन पाटील याच्या मागावर होते. मोबाईल लोकेशनद्वारे शोध घेण्याचा प्रयत्न सुरू होते. मात्र डॉ. पाटील याच्याकडील असणारी दोन्हीही मोबाईल स्वीच ऑफ केल्याने त्याचा माग काढण्यासाठी तपास पथकासमोर अडचणी निर्माण होत होता.

डॉ. पाटील याच्यावर गुन्हा दाखल होताच शैक्षणिक संस्थेला धक्का

डॉ. चेतन पाटील हा एका शैक्षणिक संस्थेत 2010 पासून कार्यरत आहे. दोन वर्षांपूर्वी त्याने पीएचडी पदवी संपादन केली आहे. राजकोट येथील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी जयदीप आपटेसह डॉ. चेतन पाटील याच्यावर सदोष मनुष्यवध व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची बातमी समजताच शैक्षणिक संस्थांच्या प्रमुख विश्वस्तांसह प्रशासनाला मोठा धक्का बसला. व्यवस्थापनानेही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण मोबाईल स्वीच ऑफ असल्याने संपर्क होऊ शकला नसल्याचे सांगण्यात आले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news