शिरढोणमध्ये फ्लॉवर पिकावर शेतकऱ्याने चालवला नांगर, दर पडल्‍याने शेतकरी हतबल

खर्च-मिळकतीचा ताळमेळ बसत नसल्‍याने १ एकरातील पीक केले उद्ध्वस्‍त
In Shirdhon, a farmer destroyed his cauliflower crop
शिरढोणमध्ये फ्लॉवर पिकावर शेतकऱ्याने चालवला नांगर, दर पडल्‍याने शेतकरी हतबलFile Photo
Published on
Updated on

शिरढोण/बिरू व्हसपटे :

सध्या फ्लॉवर पिकाला किलोमागे केवळ 2 रुपये दर मिळत असल्याने हताश होवून शिरढोण (ता. शिरोळ) येथील महेश वीरूपाक्ष सोडगे या शेतकऱ्याने हाताशी आलेल्या उभ्या पिकावर नांगर चालवीला आहे. त्यांनी एक एकरातील पीक उद्धवस्‍त करून टाकले आहे. दरम्यान टाकवडे, जांभळी, हरोली परिसरातील शेतकरी असे पाऊल उचलत आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक अरिष्ठात सापडला आहे.

कष्ट, खर्च आणि मिळकत याचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. फ्लॉवरचे दर अचानक पडल्यामुळे या शेतकऱ्याला मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागलं आहे. स्थानिक बाजारपेठेत दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ फ्लॉवरला 2 रुपये प्रति किलो दर मिळाला. त्यामुळे येथील फ्लॉवर पिकवणारे सर्वच शेतकरी हतबलता व्यक्त करत आहेत. याआधीही काहींनी उभ्या पीकावर ट्रॅक्टर चालवले आहेत.

येथील शेतकरी सामान्यत: स्थानिक बाजारपेठेत त्यांचा माल विकतात. त्यानंतर तो माल कोल्हापूर, सांगली, मिरज, जयसिंगपूर येथील मोठ्या बाजारपेठेत जातो. आता या हंगामात शिरोळ तालुक्यात शेकडो हेक्टर क्षेत्रावर फ्लॉवर पिकाची पेरणी झालेली आहे. बाजारात मागणीपेक्षा जास्त फ्लॉवर आल्यामुळे त्याचे दर पडल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थीक तोट्याला समोरं जावं लागलं आहे. लागणी पासून तोडणीपर्यंत असंख्य अडचणींना सामोरे जात शेतकऱ्यांनी फ्लॉवर पीक घेतले. मात्र अचानक दर पडल्याने अगदी कष्ठाने पिकवलेल्या पिकावर नजरेसमोर पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

एकरी 60 ते 70 हजार रुपये खर्च झाला आहे. किलोमागे केवळ 2 रुपये दर मिळत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खर्च आणि या पिकातून मिळणारी मिळकत या मोठ्या प्रमाणात तफावत असल्यामुळे नुकसानीत शेती करणे जिकरीचे बनले आहे. दरपाडीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

शेतकरी, महेश सोडगे शिरढोण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news