Kolhapur Crime News | पुलाची शिरोलीत तरुणाकडून बेकायदेशीर पिस्तूल जप्त; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून राजवर्धन आनंदराव पाटील याला ताब्यात घेतले
Pistol
PistolPudhari File Photo
Published on
Updated on

नागाव : शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीररीत्या गावठी बनावटीचे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी सांगलीतील एका २१ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून लोखंडी पिस्तूल आणि मॅगझीन असा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ, अंकुर विद्यालयाच्या बाजूला दि. १७ मार्च रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास पुलाची शिरोली येथील एक संशयास्पद तरुण असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. शिरोली एमआयडीसी पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून राजवर्धन आनंदराव पाटील (वय २१, रा. आंबा चौक, कुपवाड रोड, सांगली) याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे विनापरवाना बेकायदेशीररीत्या बाळगलेले गावठी बनावटीचे लोखंडी पिस्तूल आणि एक मॅगझीन मिळून आले. या मुद्देमालाची किंमत सुमारे तीस हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

राजवर्धन पाटील याच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम ३(१), २५ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १२२ नुसार गुन्हा (रजि. नं. ८८/२०२६) दाखल करण्यात आला आहे. याप्रप्रकरणी पोलीस हवालदार सुहास मधुकर संकपाळ यांनी फिर्याद दिली आहे. ही कारवाई शिरोली एमआयडीसी पोलीस व अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स कोल्हापूर आणि पुणे पथकाने केली. यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, सहा. फौजदार शेंगाळ, अनिल पास्ते, पोलीस हवालदार माने, पवार, पाटील, गवळी आणि बेंद्रे यांचा समावेश होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news