illegal sonography case | अवैध गर्भलिंग निदान; डॉक्टरसह तिघे ताब्यात

illegal sonography case |
illegal sonography case | अवैध गर्भलिंग निदान; डॉक्टरसह तिघे ताब्यातpudhari photo
Published on
Updated on

बिद्री : बिद्री (ता. कागल) येथील श्रद्धा हॉस्पिटलवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून अवैधरीत्या गर्भलिंग निदान करणारे मशिन ताब्यात घेतले. रुग्णालयाचा डॉक्टर युवराज पाटील, एजंट शिंदे याच्यासह एका मेडिकल चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. काही संशयास्पद औषधेही हस्तगत करण्यात आली आहेत. एलसीबी आणि इस्पुर्ली पोलिस ठाण्याच्या पथकाने ही संयुक्त कारवाई केली. मध्यरात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.

बिद्री येथील श्रद्धा हॉस्पिटलमध्ये अवैध गर्भलिंग निदान होत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी डमी महिला गर्भलिंग तपासणीसाठी पाठवून खात्री केली आणि छापा टाकला. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक सागर वाघ आणि इस्पुर्ली पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक क्रांती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई केली. गारगोटी-कोल्हापूर राज्य मार्गावर असलेल्या या रुग्णालयात गेल्या अनेक वर्षांपासून गर्भलिंग तपासणी सुरू असल्याची जोरदार चर्चा होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news