Illegal Sex Determination | कळंब्यात लॉजवर गर्भलिंग निदान; एजंटसह महिला ताब्यात

करवीर पोलिसांचा छापा; मुख्य सूत्रधार बोगस डॉक्टर मशिनसह पसार
Illegal Sex Determination |
Illegal Sex Determination | कळंब्यात लॉजवर गर्भलिंग निदान; एजंटसह महिला ताब्यातfile photo
Published on
Updated on

कोल्हापूर : कळंबा येथील एका लॉजवर करवीर पोलिसांनी रविवारी रात्री छापा टाकून एजंटसह महिलेस ताब्यात घेतले. मुख्य सूत्रधार बोगस डॉक्‍टर मात्र मशिनसह पसार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

कळंबा परिसरातील एका लॉजमध्ये बेकायदा गर्भलिंग निदान सुरू असल्याची माहिती करवीर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांना मिळाली होती. यानुसार शनिवारी रात्री नऊच्या सुमारास करवीर पोलिसांनी लॉजवर छापा टाकला. छाप्याची कुणकुण लागताच मुख्य सूत्रधार बोगस डॉक्टर सोनोग्राफी मशिनसह पसार झाला. मात्र एक एजंट आणि तपासणीसाठी आलेली महिला पोलिसांच्या हाती लागली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

जामिनावर सुटल्यावर बोगस डॉक्टर पुन्हा सक्रिय

कोल्हापूर : चार ते पाच वेळा पोलिसांनी कारवाई करून अटक केलेला बोगस डॉक्टरच लॉजवरील गर्भलिंग निदान प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. यापूर्वीही तो बालिंगा येथील छापादरम्यान पोलिसांना चकवा देऊन पसार झाला होता. दोन महिन्यांनंतर त्याला अटक केली होती.

लॉजवर दिवसभर तपासणी

कळंबा परिसरातील एका लॉजमध्ये गर्भवतींना बोलवून सोनोग्राफी मशिनवर गर्भलिंग निदान सुरू होते. रविवारी दिवसभर या ठिकाणी तपासणी सुरू होती. एजंट काही ठराविक अंतरावर थांबून महिलांना तपासणीसाठी लॉजवर नेत होता. याप्रकरणी लॉजमालकालाही आरोपी करण्यात येणार आहे.

आता तरी ‘मोका’ कारवाई गरजेची

या प्रकरणातील मुख्य संशयित एक बोगस डॉक्टरच आहे. त्याच्यावर आजपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात विविध पोलिस ठाण्यांत पाच गुन्हे दाखल आहेत. सहा महिन्यांपूर्वीच तो जामिनावर बाहेर आला असून, पुन्हा त्याने गर्भलिंग निदान सुरू केले आहे. पैसे मिळवण्यासाठी तो पुन्हा सक्रिय होत असल्यामुळे त्याच्यावर आता ‘मोका’ कारवाई करणे गरजेचे आहे.

सहा महिन्यांत चार छापे

कोल्हापूर जिल्ह्यात गर्भलिंग निदानाचा सुळसुळाट झाला आहे. सहा महिन्यांत पोलिसांनी चार छापे टाकले ओहत. बालिंगा, भोगावती, बिद्री, आणि आता कळंबा या परिसरात या कारवाया करण्यात आल्या आहेत. वारंवार कारवाई करूनही नवीन ठिकाणी गर्भलिंग केंद्रे सुरू होत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news