Crime News
kolhapur | जनावरांची अवैध वाहतूक; शिरोळमधील दोघांवर गुन्हाFile Photo

kolhapur | जनावरांची अवैध वाहतूक; शिरोळमधील दोघांवर गुन्हा

शिरोळ पोलिसांची कारवाई
Published on

शिरोळ : येथील शिरोळ-शिरटी मार्गावर कत्तलीच्या उद्देशाने जनावरांची निर्दयपणे वाहतूक करणार्‍या वाहनावर शिरोळ पोलिसांनी सोमवारी (दि. 1) दुपारी कारवाई केली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना रंगेहाथ पकडले असून, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अब्दुल इकबाल बागवान (वय 47) आणि सलीम रफिक बेपारी (वय 32, दोघेही रा. शिरोळ) अशी संशयितांची नावे आहेत.

चारचाकी वाहनातून (क्र. एमएच 09 ईएम 6267) ही अवैध वाहतूक सुरू होती. या वाहनात 14 गोवंश जातीचे नर, 2 मादी आणि म्हैस जातीची 8 रेडके अशी एकूण 24 जनावरे अत्यंत दाटीवाटीने कोंबण्यात आली होती. यापैकी एका म्हशीच्या रेडकाचा गुदमरून मृत्यू झाल्याचे आढळून आले.

या कारवाईत पोलिसांनी वाहनासह सुमारे 3 लाख 11 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये जनावरांची किंमत अंदाजे 11,200 रुपये आहे. याबाबत संदीप कृष्णा रानमोळे यांनी फिर्याद दिली असून, पोलिस हवालदार काळेल अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news