Illegal Abortion Pills | काळ्या बाजारात गर्भपाताच्‍या गोळ्या, उमलण्‍याआधीच खुडतात कळ्या

बोगस डॉक्टर, दलाल, अनधिकृत विक्रेत्यांकडून राजरोस पुरवठा : ऑनलाईन गोळ्यांनाही हवा लगाम
Illegal Abortion Pills |
Illegal Abortion Pills | काळ्या बाजारात गर्भपाताच्‍या गोळ्या, उमलण्‍याआधीच खुडतात कळ्या
Published on
Updated on

अनुराधा कदम

कोल्हापूर : बेकायदेशीर गर्भलिंग चाचणीमध्ये स्त्रीभ्रूण असल्याचे सांगून गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्यांचा काळा बाजार जिल्ह्यात फोफावला आहे. बोगस डॉक्टर, दलाल आणि नोंदणी नसलेल्या औषध विक्रेत्यांच्या संगनमताने गर्भपाताच्या गोळ्यांचा राजरोस पुरवठा करणारी साखळी गर्भवतींसाठी जीवघेणी ठरत आहे; तर ऑनलाईन साईटद्वारे मिळणाऱ्या गर्भपाताच्या गोळ्यांनाही लगाम लावण्याची गरज आहे.

गर्भपाताची औषधे केवळ तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि वैद्यकीय देखरेखीखालीच वापरायची असतात. मात्र तपासात समोर आलेल्या काही प्रकरणांत या औषधांचा अनधिकृत पुरवठा आणि त्यातून होणारे आर्थिक व्यवहार उघड झाले आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याने मिळणारे तीनशे रुपयांचे किट काळ्या बाजारात ३ हजारांपासून १५ हजारांपर्यंत विकले जाते.

कर्नाटक सीमेवर होतात व्यवहार

महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवरील आडमार्गाच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्भपाताच्या गोळ्यांचा अनधिकृत साठा केला जात आहे. त्यावर कोणाचेच नियंत्रण नाही. यामध्ये काही नोंदणी नसलेल्या औषध विक्रेत्यांचाही सहभाग आहे. डॉक्टरच्या हाताखाली काम करणारे कंपाऊंडर, काही डॉक्टरांचे पीआरओ यांच्याकडून गर्भपाताच्या गोळ्यांची बेकायदेशीर खरेदी होते.

गोळ्या विक्रीची साखळी

गर्भवतीशी एजंट संपर्क साधतो

बेकायदेशीर गर्भलिंगनिदान व गर्भपाताची व्यवस्था केली जाते

अवैध पद्धतीने गोळ्यांचा पुरवठा

पाच ते सहा पट किमतीने गोळ्यांची विक्री होते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news