रिलेशन ठेव नाही तर सर्वांनाच संपवून टाकीन, पोलिसाची दारूच्या नशेत धमकी

शिरोली पोलिसात गुन्हा दाखल
If you don't keep the relationship, i will kill everyone in you family, the drunken policeman threatens
रिलेशन ठेव नाही तर सर्वांनाच संपवून टाकणार, पोलिसाची दारूच्या नशेत धमकी हवालदार अझर खतीब
Published on
Updated on

शिरोली एमआयडीसी : महिलेने दोन वर्षापासून रिलेशन ठेवले नाही. या रागातून पोलीस हवालदाराने दारूच्या नशेत महिलेच्या घरात घुसून तिच्या आई आणि मुलगीसमोर शिवीगाळ देत "मी स्वत: ही मरणार व तुला आणि तुझ्या घरातील लोकांना ही संपवणार अशी धमकी पोलीस हवालदाराने दिल्याने शिरोली पोलिसात हवालदार अझर खतीब याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

If you don't keep the relationship, i will kill everyone in you family, the drunken policeman threatens
आजचे राशिभविष्य, जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? - शुक्रवार 2 ऑगस्ट २०२४

घटनास्थळावरून आणि पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार, हेरले येथील पोलीस हवालदार अझर खतीब याची एका महिलेशी फेसबुकच्या माध्यमातून मैत्री झाली. पुढे मैत्री वाढत गेल्यामुळे महिलेच्या घरी जेणे सुरू झाले, आणि पुढठे ते वाढत राहिले.

.य़ा महिलेने हवालदार खतीब यास घरी येण्यास मज्जव केला होता. परंतु, तरीही हवालदार खतीब महिलेच्या घरी जात होता. यामुळे संबंधीत महिलेने दोन वर्षापूर्वी तंटामुक्त अध्यक्षांकडे तक्रार केली.

अध्यक्षांनी शिरोली पोलीस ठाण्यात येऊन खतीब याला समज दिली होती तरीही खतीबवर कोणताच फरक पडला नाही तो फिर्यादीस वारंवार आधूनमधून भेटून फोन करून जीवे मारण्याची धमकी देत होता.

If you don't keep the relationship, i will kill everyone in you family, the drunken policeman threatens
स्वप्निलने कोल्हापूरसह देशाचे नाव उंचावले : डॉ. प्रतापसिंह जाधव

बुधवारी (दि.31) फिर्यादी महिला आपल्या आईचे औषध आणण्यासाठी कोल्हापूर येथे गेल्यावर खतीब हा दारूच्या नशेत त्यांच्या घरात घुसून फिर्यादीस आई व मुलीच्या समोर शिविगाळ देत मी स्वत: ही मरणार व तुला आणि तुझ्या घरातील सर्वांना मारणार अशी धमकी दिल्याने महिलेने शिरोली पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news