चैनीसाठी मंदिरांतील दानपेट्या फोडणाऱ्या दोन युवकांना अटक

Ichalkaranji News | चैनीसाठी मंदिरांतील दानपेट्या फोडणाऱ्या दोन युवकांना अटक
Ichalkaranji news
चैनीसाठी मंदिरांतील दानपेट्या फोडणाऱ्या दोन युवकांना अटकfile photo
Published on
Updated on

इचलकरंजी : चैनीसाठी इचलकरंजीसह हुपरी परिसरात मंदिरांतील दानपेट्या फोडून चोऱ्या करणाऱ्या माणकापूर (ता. चिकोडी) येथील अभिषेक रवींद्र कांबळे (वय १८) व ऋत्विक राजू संकपाळ (२२) या दोघा युवकांना गावभाग पोलिसांनी अटक केली. या दोघांकडून इचलकरंजीतील ८ तसेच हुपरीतील २ असे १० मंदिरांतील चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. याची माहिती पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे व पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिली.

इचलकरंजी शहर व परिसरात गेल्या दोन महिन्यांमध्ये मंदिरांमध्ये दानपेट्या फोडून चोऱ्यांचे सत्र वाढले होते. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी अपर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांना मंदिर चोऱ्या उघडकीस आणण्यासाठी विशेष पथक नेमण्याच्या सूचना दिल्या होत्या. याच दरम्यान हुपरी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे असणाऱ्या गणेश मंदिरातही बुधवारी रात्री चोरीचा प्रकार घडला होता. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून तपास करीत असताना गोपनीयरीत्या मिळालेल्या माहितीवरून गावभागचे पोलिस कॉन्स्टेबल अमर कदम यांना दोघे संशयित माणकापूर येथील असल्याचे समजले. तातडीने दुपारी कारवाई करीत माणकापूर येथून संशयित कांबळे व संकपाळ या दोघांना ताब्यात घेण्यात आले.

पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी चोरीची कबुली दिली. शहरातील सांगली रोडवरील हनुमान मंदिर, रखना कॉर्नर दत्त मंदिर, हनुमान मंदिर जय सांगली नाका, हनुमान मंदिर मर्दा प्रोसेस, हनुमान मंदिर विक्रमनगर, राम मंदिर सातपुते गल्ली, गणेश मंदिर राजाराम स्टेडियम, दत्त मंदिर लिंबू चौक या मंदिरांसह हुपरीतील गणेश मंदिर शिवाजी चौक, हनुमान मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली आहे. दोघांकडून मंदिरांमधील १० चोप्या उघडकीस आल्या आहेत.

ही कारवाई पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विजय गोडसे, पोसई श्रीकांत वाघमारे, पोहेकों अनिल पाटील, पोकों अमर कदम, अमित कदम, राम पाटील, नितीन ढोले यांच्या पथकाने केली.

दानपेट्या फोडल्या; पण दागिन्यांना हात लावला नाही

चोरट्यांनी निव्वळ चैनीसाठी मंदिरांतील चोऱ्या करण्याचे सत्र हाती घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. दोघेही निपाणी येथे मिळेल ते काम करीत होते. रात्री मंदिरे लक्ष्य करायची, तेथील दानपेट्या फोडून पसार व्हायचे, अशी त्यांची चोरीची पद्धत होती. चोरी करताना निव्वळ दानपेट्याच फोडल्या असून, मंदिरांतील दागिन्यांना मात्र त्यांनी हात लावला नसल्याचे उघड झाले आहे.

दानपेट्या फोडल्या; पण दागिन्यांना हात लावला नाही

चोरट्यांनी निव्वळ चैनीसाठी मंदिरांतील चोऱ्या करण्याचे सत्र हाती घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. दोघेही निपाणी येथे मिळेल ते काम करीत होते. रात्री मंदिरे लक्ष्य करायची, तेथील दानपेट्या फोडून पसार व्हायचे, अशी त्यांची चोरीची पद्धत होती. चोरी करताना निव्वळ दानपेट्याच फोडल्या असून, मंदिरांतील दागिन्यांना मात्र त्यांनी हात लावला नसल्याचे उघड झाले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news