Ichalkaranji Mayor Election | इचलकरंजीच्या पहिल्या महापौर, उपमहापौरपदाची आज निवड

Ichalkaranji Corporation Municipal
Ichalkaranji Mayor Election | इचलकरंजीच्या पहिल्या महापौर, उपमहापौरपदाची आज निवड
Published on
Updated on

इचलकरंजी : इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या महापौर - उपमहापौरपदाची सोमवारी नवनिर्वाचित सदस्यांच्या पहिल्या सभेत निवड होणार आहे. भाजप महायुतीचे वर्चस्व असल्याने महापौरपदी उदय धातुंडे व उपमहापौरपदी अ‍ॅड. अनिल डाळ्या यांची निवड निश्चित मानली जात आहे. अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या निवडीच्या प्रक्रियेसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून निवडीच्या अनुषंगाने महापालिका परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात राहणार आहे.

नगरपालिका विसजिर्र्त झाल्यानंतर साडेतीन वर्षांनंतर निवडणुकीला मुहूर्त लागला. इचलकरंजी महापालिका स्थापन झाल्यानंतर पहिल्या सत्तेच्या चाव्या मतदारांनी भाजप महायुतीच्या हाती सोपवल्या आहेत. 47 जागा मिळवत महायुतीने महापालिकेवर वर्चस्व सिद्ध केले आहे तर विरोधी शिवशाहू आघाडीला 17 आणि शिवसेना उबाठा गटाला फक्त एका जागेवर यश मिळाले आहेत. निकालानंतर 22 तब्बल दिवसांनी सोमवारी प्रत्यक्ष सभागृह अस्तित्वात येणार आहे. पहिल्या सभेत महापौर, उपमहापौर निवड होणार आहे.

नव्याने साकारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात निवडीची प्रक्रिया पार पडणार आहे. भाजप महायुतीकडून महापौरपदासाठी धातुंडे तर उपमहापौर पदासाठी अ‍ॅड. डाळ्या यांची वर्णी लागणार आहे. या दोन्ही पदांचे उमेदवारी अर्ज तसेच शिवशाहू विकास आघाडीच्या वतीने महापौरपदासाठी सयाजी चव्हाण व उपमहापौरपदासाठी संगीता आलासे यांचे अर्ज दाखल झाले आहेत. सोमवारी सकाळी 11.15 वाजता उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर 11.30 पर्यंत माघारीसाठीची मुदत देण्यात येणार आहे. निवडणूक लागल्यास हात उंचावून मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. निवडीकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आयुक्त पल्लवी पाटील, अति. आयुक्त सुषमा शिंदे, सर्व उपायुक्त, अधिकारी आदींनी सभेच्या कामकाजाचा रविवारी दुपारी आढावा घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news