Ichalkaranji Crime : इचलकरंजीत महाविद्यालयीन विद्यार्थिनीने संपविले जीवन

अभ्यासाचा ताण सहन न झाल्याने उचलले टोकाचे पाऊल
Ichalkaranji Crime News
इचलकरंजीत महाविद्यालयीन विद्यार्थिनीने संपविले जीवन
Published on
Updated on

इचलकरंजी : अभ्यासाचा ताण सहन झाल्याने महाविद्यालयीन विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपविले. हिंदवी म्हाळसाकांत कवडे (वय २३, रा. सुदर्शन चौक, इचलकरंजी) असे तिचे नाव आहे. मंगळवारी पहाटे ६.३० च्या सुमारास उघडकीस आली.

सुदर्शन चौक परिसरातील नगरसेविका शशिकला कवडे यांची ती मुलगी होय. ती सध्या बीएएमएसच्या दुसर्‍या वर्गात घटप्रभा येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती. सुट्टीमुळे ती घरी आली होती. बुधवारी पेपर असल्याने तयारी करीत होती. काही दिवसांपासून तिने अभ्यासाचा ताण घेतला होता. सोमवारी रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने तिने उपचारही घेतले होते. पहाटे आई तिला उठवण्यासाठी गेल्यानंतर हिंदवीने खोलीतील फॅनला ओढणीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. तातडीने तिला इंदिरा गांधी इस्पितळात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. या घटनेची वर्दी मंदार कवडे यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news