Kolhapur News : ई-मेल हॅक करून इचलकरंजीतील उद्योजकाची १९ लाखांची फसवणूक

परदेशी कंपनीच्या नावाने ऑनलाईन फसवणूक
 Cyber Fraud Case |
Cyber Fraud Case | (File Photo)
Published on
Updated on

इचलकरंजी : परदेशातील व्यावसायिक कंपनीच्या नावाने बनावट ई-मेल पाठवून आणि पुरवठादार कंपनीचे खाते बदलल्याचा बनाव करून उद्योजकाची १९.३३ लाखांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत रजत राजेंद्रकुमार राठी (३९, रा. रामकृष्णनगर) यांनी फिर्याद दिली.

राठी यांच्या मालकीची ‘मिरॅकल इंडस्ट्रीज’ ही औद्योगिक फर्म आहे. अज्ञाताने या फर्मचा ई-मेल आयडी हॅक करून व्यावसायिक व्यवहारांची माहिती मिळविली. २९ जून ते १५ जुलै या कालावधीत राठी यांच्याशी नियमित व्यवहार असलेल्या परदेशी कंपनीकडूनच ई-मेल आल्याचा आभास निर्माण करण्यात आला. कंपनीच्या बँक खात्यात अडचण आल्याचे सांगत ‘डीके इंटरप्रायझेस एलएलसी’च्या नावाने नवीन प्रोफॉर्मा इनव्हाईस आणि बँक ऑफ अमेरिकाचे खाते तपशील पाठविण्यात आले. त्यानुसार राठी यांनी २२ हजार २२५ अमेरिकन डॉलर्स (भारतीय चलनात सुमारे १९ लाख ३३ हजार २६६) संबंधित खात्यावर वर्ग केले. मात्र, त्यानंतरही मालाचा पुरवठा न झाल्याने, तसेच चौकशीअंती ई-मेल बनावट असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news