Kolhapur Murder Case | आधी जोडीने घेतलं जोतिबाचे दर्शन; नंतर सादळे-मादळे घाटात पत्नीवर चाकूने केले सपासप वार

Kolhapur Murder Case | सोलापूर पोलिस ठाण्यात पतीने दिली खुनाची कबुली
Kolhapur Murder Case
Kolhapur Murder CaseOnline Pudhari
Published on
Updated on

कासारवाडी | पुढारी वृत्तसेवा |Kolhapur Murder Case

हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी परिसरात आज (दि. ६ जून) सकाळी अकराच्या सुमारास एका २९ वर्षीय महिलेचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. शुभांगी सचिन रजपूत असे मृत महिलेचे नाव असून, तिचा खून पतीनेच चाकूने वार करून केल्याचे उघड झाले आहे.

Kolhapur Murder Case
Dowry harassment| हुंड्यासाठी गर्भवती पत्नीचा शारीरिक छळ; पतीविरुद्ध गुन्हा

सचिन रजपूत (वय ३२) याने पत्नीचा खून करून थेट सोलापूर पोलीस ठाण्यात हजर होत गुन्ह्याची कबुली दिली. ही माहिती मिळताच शिरोली एमआयडीसी पोलीसांनी तातडीने तपास सुरू केला.

सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने शुक्रवारी सकाळी साडेनऊपासून शोधमोहीम हाती घेतली. सादळे-कासारवाडी घाटात रस्त्यापासून सुमारे ३० मीटर अंतरावर महिलेचा मृतदेह आढळून आला.

Kolhapur Murder Case
kolhapur : 16 लाखांची चोरी करून मॉलमध्ये खरेदी, चैनीवर हजारो उधळले; 16 वर्षीय विद्यार्थी गजाआड

प्राथमिक माहितीनुसार, सचिन व शुभांगी रजपूत हे काही दिवसांपासून हनुमान नगर येथे भाड्याच्या खोलीत राहत होते. गुरुवारी दोघे जोतिबाचे दर्शनासाठी गेले होते, दर्शन आटोपल्यानंतर दोघांनी सादळे-कासारवाडी घाटमार्ग घेतला.

त्याठिकाणीच सचिन याने पत्नी शुभांगीवर चाकूने वार करत निर्घृण खून केला. खून करून तो पुन्हा घरावर जाऊन नंतर सोलापूरला पोहोचला व पोलिसांत आत्मसमर्पण केले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला असून, पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news