Attack on Wife | पत्नीवर हल्ला करून फरार झालेल्या पतीला अटक

Attack on Wife |
Attack on Wife | पत्नीवर हल्ला करून फरार झालेल्या पतीला अटकfile photo
Published on: 
Updated on: 

हुपरी : चारित्र्याच्या संशयावरून भररस्त्यात पत्नीवर धारदार कटरने प्राणघातक हल्ला करून फरार झालेला पती श्रीशैल शिवाप्पा पुजारी (वय ३५, रा. गणेश माळ, हुपरी) याला हुपरी पोलिसांनी अटक केली.

श्रीशैल व पत्नी सुजाता हुपरीतील गणेश माळ वसाहतीत भाड्याच्या घरात वास्तव्यास होते. श्रीशैल हा पंचतारांकित औद्यागिक वसाहतीतील एका कंपनीत कामास होता, तर पत्नी सुजाता पट्टणकोडोलीतील एका ज्वेलर्समध्ये कामास होत्या. सुजाता व श्रीशैल यांच्यात चारित्र्याच्या संशयावरून नेहमी भांडण होत. १२ ऑगस्ट रोजी सुजाता दुपारी जेवणाच्या सुट्टीवेळी घरी आल्या होत्या. यावेळी दोघांमध्ये याच कारणावरून पुन्हा वाद झाला.

साडेचारच्या सुमारास पत्नी सुजाता यांना कामावर दुचाकीवरून सोडण्यास जात असताना रस्त्यात त्यांच्यात पुन्हा वाद सुरू झाला. दोघे एका हॉटेलसमोर थांबले असता संतप्त झालेल्या श्रीशैलने सुजाता यांचा खून करण्याच्या उद्देशाने त्यांच्या गळ्यावर धारदार कटरने वार केला. हा प्रकार पाहून तेथील काहींनी हल्लेखोर श्रीशैलला विरोध करीत पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला; मात्र हल्ल्यातील कटर घटनास्थळी टाकून मोटारसायकलवरून तो पळून गेला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news