

Hupri Police 100 missing mobiles returned
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी पोलीस ठाण्याने उल्लेखनीय कामगिरी करत हरवलेले तब्बल १०० मोबाईल संच नागरिकांना परत दिले आहेत. या मोबाईलची एकूण किंमत सुमारे १ लाख ५१ हजार रुपये आहे.
हुपरी पोलीस ठाण्याकडे मोबाईल हरवल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. तक्रारीतील मोबाईलचे IMEI क्रमांक एकत्रित करून CEIR पोर्टलच्या माध्यमातून शोधमोहीम राबवण्यात आली.
यासाठी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक अपराजित जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते.