Navratri Festival | ‘चांगभलं’च्या जयघोषाने जोतिबा डोंगर दुमदुमला

दख्खनच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी; आज जागर
Huge crowd of devotees gathers to see the king of Deccan
Navratri Festival | ‘चांगभलं’च्या जयघोषाने जोतिबा डोंगर दुमदुमलाPudhari File Photo
Published on: 
Updated on: 

जोतिबा डोंगर : दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या दर्शनाला रविवारी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. यावेळी ‘चांगभल’च्या गजरात जोतिबा डोंगर दुमदुमला. सोमवारी (दि. 29) श्री जोतिबा देवाचा जागर सोहळा असून मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले राहणार आहे.

पहाटे तीन वाजता घंटानाद होऊन मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. यानंतर जोतिबाची पाद्यपूजा आणि काकड आरती करण्यात आली. पाच ते सहा या वेळेत ‘श्रीं’ना अभिषेक घालण्यात आला. यानंतर जोतिबाची सोहम कमळ पुष्पातील राजेशाही महापूजा बांधण्यात आली.

रविवार सुट्टी असल्याने जोतिबा डोंगरावर पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. दिवसभर दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. सकाळी नऊ वाजता धार्मिक विधी होऊन धुपारती सोहळा यमाई मंदिराकडे गेला. यमाई देवीच्या मंदिरातील विधी झाल्यानंतर जोतिबा मंदिरात सोहळ्याची सांगता झाली. रात्री उशिरापर्यंत भाविकांसह पर्यटकांची दर्शनासाठी गर्दी होती. कोडोली पोलिस ठाण्याच्या वतीने चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news