HPV Vaccine | ‘एचपीव्ही’लस घ्या... गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर टाळा

14 वर्षांवरील, पण 15 वर्षांच्या आतील कोल्हापूर मंडळातील 98 हजार 78 मुलींचे होणार लसीकरण
HPV Vaccine |
HPV Vaccine | ‘एचपीव्ही’लस घ्या... गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर टाळाw_lenu_nu541255
Published on
Updated on

एकनाथ नाईक

कोल्हापूर : सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राज्यातील 14 वर्षे पूर्ण केलेल्या, परंतु 15 वर्षांच्या आतील मुलींना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून बचाव करण्यासाठी ‘एचपीव्ही’ लसीकरण सुरू करण्यात आले आहे. ‘एचपीव्ही’ लसीकरणासाठी जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येच्या एक टक्का लोकसंख्या ही अपेक्षित लाभार्थी संख्या आहे. त्यानुसार कोल्हापूर मंडळातील 98 हजार 78 मुलींना ‘एचपीव्ही’ लस दिली जाणार आहे. यात कोल्हापूर जिल्ह्यातील 43,861 मुलींना ही लस दिली जाणार आहे. ‘एचपीव्ही’ लस घ्या... गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर टाळा, अशी मोहीम आरोग्य विभागाने गतिमान केली आहे.

‘एचपीव्ही’ लस का महत्त्वाची

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा भारतीय महिलांमध्ये आढळणार्‍या कर्करोगांपैकी दुसर्‍या क्रमांकाचा कर्करोग आहे. सन 2024 च्या आयसीएमआर-एनसीआरपीच्या अहवालानुसार भारतामध्ये गर्भाशयमुखाच्या कर्करोगाचे सुमारे 78,499 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 42,392 महिलांचा मृत्यू या आजारामुळे झाला आहे.

लस कोणाला दिली जाते व का?

लसीकरण मोहिमेंतर्गत वयाची 14 वर्षे पूर्ण केलेल्या, परंतु 15 वर्षे पूर्ण न केलेल्या राज्यातील मुलींना ‘एचपीव्ही’ लस देण्यात येत आहे. भारतात महिलांमध्ये गर्भाशयमुखाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे प्रतिबंधासाठी ‘एचपीव्ही’ लसीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे.

वंध्यत्व, गर्भपात किंवा जन्मदोष होऊ शकतात का?

वैज्ञानिक आढाव्यानुसार एचपीव्ही लसीचा वंध्यत्व, गर्भपात किंवा जन्मदोष यांच्याशी कोणताही संबंध आढळलेला नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या (थकज) लस सुरक्षितेविषयीच्या जागतिक सल्लागर समितीने सातत्याने उपलब्ध सुरक्षिततेच्या माहितीचा आढावा घेतला असून, ही लस सुरक्षित व प्रभावी असल्याचे स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news