फरार काळात मटका बुकी कोराणेकडे 16 लाख कोठून आले?

तपासाधिकार्‍यांचा युक्तिवाद, पत्नीच्या नावे मालमत्तांची खरेदी; 25 पर्यंत पोलिस कोठडीत वाढ
 Kolhapur News
कोल्हापूर : मोका अंतर्गंत कारवाई झालेला मटकाबुकी सम—ाट कोराणे याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यास मंगळवारी दुपारी विशेष मोका न्यायालयाचे न्यायाधीश यांच्यासमोर बंदोबस्तात हजर करण्यात आले. ( छाया : नाज ट्रेनर )
Published on
Updated on

कोल्हापूर : मोका अंतर्गत कारवाईनंतर मटकाबुकी सम—ाट कोराणे सहा वर्षे फरार होता. याकाळात त्याच्याकडे 16 लाख रुपये कोठून आले आणि त्याचा त्याने खर्च कोठे व कसा केला, याचा तपास आवश्यक असल्याचा युक्तिवाद शहर पोलिस अधीक्षक तथा तपासाधिकारी अजित टिके यांनी मंगळवारी विशेष मोका न्यायालयात केला. याच काळात कोराणे याने ताराबाई पार्क व कराड तालुक्यातील साळशिरंभे या ठिकाणी पत्नीच्या नावे काही मालमत्ता खरेदी केल्याचेही तपासात उघड झाले आहे, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.

विशेष मोका न्यायालयाचे न्यायाधीश डी. व्ही. कश्यप यांनी सम—ाट कोराणे याच्या पोलिस कोठडीत 25 फेब—ुुवारीपर्यंत वाढ करण्यात येत असल्याचे सांगितले. मुंबईतील कुख्यात मटका किंग व फरारी संशयित प्रकाश ऊर्फ पप्पू सावला याच्याशी असलेल्या आर्थिक संबंधाचाही तपासाच्याद़ृष्टीने महत्त्वाचा भाग असल्याचेही तपासाधिकारी टिके यांनी विशेष मोका न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील अ‍ॅड. अमित महाडेश्वर व आरोपीचे वकील अ‍ॅड. एस. वाय. माने यांनी न्यायालयात युक्तिवाद केला.

मटकाबुकी सम—ाट कोराणे याच्या 11 दिवसांची पोलिस कोठडीची मंगळवारी मुदत संपल्यानंतर दुपारी त्यास पोलिस बंदोबस्तात विशेष मोका न्यायालयाचे न्यायाधीश कश्यप यांच्यासमोर हजर करण्यात आले. विशेष सरकारी वकील अ‍ॅड. अमित महाडेश्वर युक्तिवाद करताना म्हणाले, मोका अंतर्गत कारवाईनंतर सम—ाट कोराणे 6 वर्षे फरारी राहिला. याकाळात त्याच्याकडे 16 लाखांहून अधिक रक्कम पाठविल्याचे दिसून येते. हे पैसे त्याला कोणी व कशासाठी दिले, याचा शोध महत्त्वाचा आहे. त्याने यापैकी बरेच पैसे एटीएममधून काढून खर्च केल्याचे दिसून येते.

फरार काळात सम—ाट कोराणे मोटारीतून फिरत होता. या मोटारी कोणाच्या होत्या? त्याच्याकडे त्या कशा आल्या? याचाही तपास महत्त्वाचा असल्याचे विशेष सरकारी वकिलांनी स्पष्ट केले. ताराबाई पार्क तसेच कराड तालुक्यात सम—ाट कोराणे याने पत्नीच्या नावे काही मालमत्तांची खरेदी केली आहे. या व्यवहारासाठी त्याने पैसा कोठून आणला, याचा शोध घ्यावा लागेल. कोराणे याच्या शिवाजीपेठ येथील घराची तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्याठिकाणी 23 हजारांच्या जुन्या नोटा आढळून आल्या आहेत. याशिवाय रोख 68 हजारांची रोकडही मिळाली आहे. ही रक्कम कोणाची आहे, याचाही तपास करावा लागेल.फरारी काळात सम—ाट कोराणेला कोण कोण आर्थिक मदत केली? मदत करणार्‍यांनी हा पैसा कोठून आणला? याचा तपास करण्यासाठी आणखी जादा पोलिस कोठडीची आवश्यकता असल्याचेही विशेष सरकारी वकिलांनी विशेष मोका न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

मुंबईतील कुख्यात मटका किंग पप्पू सावला याच्याशी सम—ाट कोराणे याचे काय संबंध आहेत, याचा तपासात उलगडा होण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी सांगितले. फरार काळात सम—ाट कोराणेचा मोबाईल कोण कोण वापरला? त्याचा सीडीआर काढण्यासाठी तपासाधिकार्‍यांचे पत्रव्यवहार सुरू असल्याचेही युक्तिवादात त्यांनी सांगितले. सम—ाट कोराणे याचे वकील अ‍ॅड. माने यांनी पोलिसांना न्यायालयात दिलेली कारणे जुनीच आहेत, असे स्पष्ट केले. 11 दिवसांसाठी दिलेली पोलिस कोठडी तपासासाठी पुरेशी असल्याचे आणखी नव्याने पोलिस कोठडीची गरज नसल्याचे त्यांनी विशेष मोका न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. सुनावणीवेळी कोराणे याच्या नातेवाईकांसह त्याचे समर्थक उपस्थित होते. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news