falling tree at Gudal
गुडाळ (ता. राधानगरी) येथील विश्वास पाटील यांच्या घरावर झाड कोसळले.Pudhari News Network

Kolhapur Rain | गुडाळ येथे झाड कोसळून घराचे नुकसान

आज पहाटे दुर्घटना,
Published on

गुडाळ : पुढारी वृत्तसेवा : वादळी वाऱ्याने गुडाळ (ता. राधानगरी) येथील विश्वास मारुती पाटील यांच्या राहत्या घरावर निलगिरीचे झाड कोसळल्याने घराची मोठी हानी झाल्याची दुर्घटना गुरुवारी (दि. २५) पहाटे घडली.

falling tree at Gudal
Kolhapur Monsoon Update| कोल्हापूर : टाकवडे-इचलकरंजी संपर्क तुटला

राधानगरी तालुक्याच्या पश्चिम भागात गेले पंधरा दिवस अतिवृष्टी सुरू आहे. त्यातच गेले चार दिवस जोरदार वादळी वारे ही वाहत आहेत. गुरुवारी पहाटे विश्वास पाटील यांच्या घरामागे असलेले निलगिरीचे भले मोठे झाड घरावर पडल्याने छतावरील सिमेंट पत्रे, रूफ काम, बाथरूम दरवाजा आणि भिंतीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या दुर्घटनेत ७० हजारांहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

गाव कामगार तलाठी पी.आय. गुरव, कोतवाल कुमार कांबळे यांनी दुर्घटनेचा पंचनामा केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news