kolhapur Crime News | दरवाजा तोडून, घरात घुसून सख्ख्या भावांना मारहाण; चौघांवर गुन्हा

फुलेवाडी येथील घटना; संशयित पसार
kolhapur Crime News
kolhapur Crime | दरवाजा तोडून, घरात घुसून सख्ख्या भावांना मारहाण; चौघांवर गुन्हाFile Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : भांडणात मध्यस्थी करणाऱ्या तरुणाच्या घराचा दरवाजा तोडून, घुसून दोघा सख्ख्या भावांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना फुलेवाडी येथील पहिला बसस्टॉप परिसरात घडली. या घटनेत सिद्धार्थ उत्तम धुरे (वय २६) याच्यासह त्याचा भाऊ जखमी झाला. याप्रकरणी चौघाविरुद्ध जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

संशयित आर्यन कांबळे (रा. लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर), समर्थ कागेकर (फुलेवाडी), प्रज्वल कांबळे, सूरज कोकीटकर (फुलेवाडी पहिला बसस्टॉप, कोल्हापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. घटनेनंतर संशयित पसार झाल्याचे सांगण्यात आले. फिर्यादी सिद्धार्थ धुरे याचा मित्र योगेश महेकर याच्याशी संशयित आर्यन कांबळेसह साथीदारांशी वाद झाला होता. हा वाद हातघाईवर आला होता. त्यामुळे सिद्धार्थ भांडणे मिटविण्यासाठी शनिवारी ( दि.२७) संशयित तरुणांकडे गेला होता. त्याचा राग मनात धरून आर्यन कांबळेसह त्याच्या मित्रानी सिद्धार्थ धुरे याच्यावर चाल केली.

धुरे याच्या घराचा दरवाजा तोडून प्रवेश केला. प्रज्वल कांबळे याने लाकडी काठीने त्याच्या तोंडावर, पाठीवर, पोटावर, नाकावर हल्ला केला. यावेळी सिद्धार्थला वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्याच्या सख्ख्या भावालाही संशयितानी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून जखमी केले. जखमीस शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिस निरीक्षक किरण लोंढे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. संशयिताना लवकरच अटक करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news