

पाचगाव : येथे श्रीकृष्ण कार्यालयासमोर घरफोडी झाली. यावेळी चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने व महत्त्वाची कागदपत्रे असा 2 लाख 86 हजारांचा ऐवज लंपास केल्याची तक्रार करवीर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
यल्लाप्पा आयाप्पा गोरेल (वय 54, रा. कृष्ण मंदिर, गवळी समाज कार्यालयासमोर, गिरगाव रोड, पाचगाव) हे 19 रोजी दुपारी 2.15 ते रात्री 10.30 या वेळेत घराबाहेर होते. याच दरम्यान चोरट्यांनी घराचा लोखंडी दरवाजा काढून घरात प्रवेश केला. कपाटातील सोन्याची चेन, अंगठी, मंगळसूत्र, चांदीचे दागिने आणि पॅन कार्ड, आधार कार्ड यांसह महत्त्वाची कागदपत्रे असा एकूण दोन लाख 86 हजार किमतीचा ऐवज लंपास केला आहे.