Kolhapur News : शिवीगाळ, धक्काबुक्की अन्‌‍ अधिकाऱ्यांची गळपट्टी

करवीर पंचायत समितीत जोरदार राडा; व्हिडीओ व्हायरल
Karveer Panchayat Samiti
करवीर पंचायत समितीत जोरदार राडा
Published on
Updated on

कोल्हापूर : करवीर पंचायत समितीच्या कार्यालयात सोमवारी दुपारी जोरदार राडा झाला. शिवीगाळ, धक्काबुक्कीसह पंचायत समितीमधील अधिकाऱ्यांची गळपट्टी धरण्याचा प्रकार घडला. आरडाओरड, सहकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गोंधळ यामुळे काहीकाळ तणावाची स्थिती निर्माण झाली. लक्ष्मीपुरीचे अधिकारी, पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही बाजूकडून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला. या घटनेचा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला.

हातकणंगले तालुक्यात बचत गटाच्या माध्यमातून महिला गारमेंट क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या दीपा घारगे करवीर पंचायत समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती घेण्यासाठी दुपारी कार्यालयात आल्या होत्या. कार्यालयातील अधिकारी प्रकाश लाड यांच्याकडून त्या माहिती घेत होत्या. पाणीपुरवठा विभागातील पाटील नामक अधिकारी तेथे आले, त्यांनी लाड यांच्याशी संपर्क साधून ताबडतोब आपल्याबरोबर येण्याची सूचना केली. यावर घारगे व पाटील यांच्यात वादावादी झाली. कार्यालयासह परिसरातील नागरिकांची गर्दी झाली. वरिष्ठाधिकाऱ्यांनीही समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबंधित महिला आक्रमक बनल्या होत्या. लक्ष्मीपुरीचे निरीक्षक श्रीराम कण्हेरकर यांच्यासह पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी समेटाचा प्रयत्न केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news