हेरवाड ग्रामपंचायतीतील दप्तर ‘चोरी’ प्रकरण; लोकप्रतिनिधी व कर्मचाऱ्याचा संशय

Herwad Gram Panchayat news | चौकशीच्या भीतीनेच कागदपत्रे परत
Crime News
Crime Newsfile photo
Published on
Updated on

कुरुंदवाड : हेरवाड (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायतीतील महत्त्वाचे दप्तर आठ दिवसांपूर्वी चोरीला गेल्यानंतर, एका कर्मचाऱ्यानेच ते पुन्हा कार्यालयात आणून ठेवल्याची बाब समोर आली असून, या प्रकरणात एका लोकप्रतिनिधीचाही संशय व्यक्त होत आहे. गायरान प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती दाखल झाल्याने आणि चौकशीनंतर पोलिसांत गुन्हा दाखल होण्याच्या भीतीपोटीच ९ तारखेला संबंधितांनी हे दप्तर परत आणून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

ग्रामविकास अधिकाऱ्यांनी पंचायत समितीकडे दिलेल्या तक्रारीनुसार, ग्रामपंचायतीतील काही महत्त्वाची कागदपत्रे अचानक गायब झाली होती. दरम्यान, गायरान जमिनी संदर्भातील चौकशीसाठी समिती ग्रामपंचायतीत दाखल झाली. या चौकशीदरम्यान दप्तरांची तपासणी होणार असल्याची माहिती मिळताच, चोरी केलेल्या कागदपत्रांचा भांडाफोड होईल या भीतीनेच संबंधितांनी ते पुन्हा कार्यालयात आणून ठेवल्याचे समोर येत आहे.

विशेष म्हणजे हे दप्तर ग्रामपंचायतीतील एका कर्मचाऱ्यानेच कार्यालयात आणून ठेवल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी संजय पुकाळे यांनी दिली आहे. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्याने हे कागदपत्र कोणाच्या सांगण्यावरून बाहेर काढले का, तसेच या प्रकरणात एखाद्या लोकप्रतिनिधीचा सहभाग आहे का, याबाबत तालुक्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

तक्रार दाखल केल्यानंतर ग्रामविकास अधिकाऱ्यांनी पंचायत समितीकडे पुन्हा अर्ज सादर करत गहाळ दप्तर मिळून आल्याचे नमूद केले आहे. त्यानंतर पंचायत समिती प्रशासनाने सर्व संबंधित कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवण्याचे आदेश दिले असून, या जबाबांमधून दप्तर चोरीमागील खरे सूत्रधार समोर येणार की प्रकरण दडपले जाणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

शासकीय दप्तर चोरीला जाणे आणि पुन्हा कार्यालयात जमा होणे हा प्रकार अत्यंत गंभीर मानला जात असून, नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे ग्रामपंचायतीच्या कारभाराच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

प्रकरणाची पुरावे गोळा करून दोषींवर कारवाई करणार “दप्तर गहाळ होणे व पुन्हा मिळणे या दोन्ही बाबींची सखोल चौकशी सुरू आहे. संबंधित प्रकरणाची पुरावे गोळा करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.”

- सरपंच सौ. रेखा जाधव

गहाळ झालेले दप्तर पुन्हा कार्यालयात “ग्रामपंचायतीतील गहाळ झालेले दप्तर आम्ही पंचायत समितीकडे कळवले होते. चौकशीच्या भीतीपोटी संबंधितांनी ते पुन्हा कार्यालयात आणून ठेवल्याचे निदर्शनास आले आहे. हे दप्तर एका कर्मचाऱ्याने आणून ठेवले असून, सर्व संबंधितांचे जबाब नोंदवण्याचे आदेश आले आहेत.”

– ग्रामविकास अधिकारी संजय पुकाळे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news