चावरे येथे काविळीची साथ: आमदार अशोकराव मानेंनी घेतली बैठक

Ashokrao Mane | तातडीने उपाययोजना करण्याच्या सुचना
Ashokrao Mane meeting in Chavare
आमदार अशोकराव माने यांनी चावरे येथे संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली.Pudhari Photo
Published on
Updated on

किणी: पुढारी वृत्तसेवा : चावरे (ता. हातकणंगले) येथे काविळ साथ आल्याने नूतन आमदार डॉ. अशोकराव माने यांनी चावरे येथे संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी तातडीने उपाय योजना करण्याच्या सुचना दिल्या. यासाठी लागेल ती मदत करु, अशी ग्वाहीही माने यांनी यावेळी दिली.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, जिल्हा आरोग्य सहाय्यक संचालक डॉ. सतीश सुर्यंवशी, आरोग्य निरीक्षक कृष्णात मोहिते, जिल्हा साथ, रोग अधिकारी डॉ. सुशांत रेवडेकर, तालुका वैद्यकिय अधिकारी पी. एस. दातार, अंबप प्राथमिक आरोग्य केंद्राचे पंकज काळे, सरपंच उदयसिंह पाटील आदीसह ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी डॉ. माने यांनी नागरिकांनी सरकारी रुग्णालयात उपचार घ्यावेत. साथीचे आजार पासरण्याआधी नागरिकांनी ते होऊ नये, याची काळजी घ्यावी, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा करुन काविळ साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या.

सरपंच उदयसिंह पाटील, उपसरपंच मकरंद बोराडे, ग्रामविकास अधिकारी अनुपमा सिदनाळे यांनी गावातील काविळ रुग्णांची माहिती दिली. जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुध्द पिंपळे म्हणाले, साथ अटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. गावात सध्या ३४ रुग्ण असून नागरिकांनी घाबरु नये. लोकांनी पाणी उकळून थंड करुन प्यावे.

हातकणंगलेच्या गटविकास अधिकारी मोकाशी यांनी ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाच्या वतीने उपचार आणि प्रबोधन करण्याचे काम सुरु आहे. रक्त चाचण्या मोफत आहेत. ग्रामपंचायत स्थापित रुग्णालयातील सुविधेचा उपयोग करुन घ्यावा, असे सांगितले.

यावेळी निवृत्त पोलीस अधीक्षक जयकुमार सुर्यंवशी, विस्तार अधिकारी ए. एस. कटारे, एन. आर. रामान्ना, जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्षा डॉ. निता माने, वडगाव बाजार समिती सदस्य बी. जी. बोराडे, पोलीस पाटील दिलीप महाडिक, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अमरसिंह शिंदे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा सेविका उपस्थित होत्या.

Ashokrao Mane meeting in Chavare
कराड : कोल्हापूर नाक्यावरील अपघातात महिला ठार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news