Helium shortage | राज्यातील 1,200 एमआरआय मशिन्सला ‘हेलियम’टंचाईचा फटका; कतारमधून भारताला होणारा 80 टक्के ‘हेलियम’पुरवठा खंडित

मेंदू, मणक्याचे आजार आणि कॅन्सरच्या सूक्ष्म निदानात अडचणी येणार?
MRI machines crisis
Helium shortage | राज्यातील 1,200 एमआरआय मशिन्सला ‘हेलियम’टंचाईचा फटका; कतारमधून भारताला होणारा 80 टक्के ‘हेलियम’पुरवठा खंडित
Published on
Updated on

तानाजी खोत

कोल्हापूर : आखाती देशांतील युद्धामुळे भारतात होणारा 80 टक्के ‘हेलियम’पुरवठा खंडित झाल्याने वैद्यकीय क्षेत्रासमोर मोठे संकट उभे आहे. ‘एमआरआय’ (मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग) मशिनसाठी लागणार्‍या ‘लिक्विड हेलियम’ची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. मशिनमधील हेलियमस्तर कायम ठेवण्यासाठी हेलियम मिळाला नाही तर काम बंद होण्याची भीती व्यक्त होत आहे. राज्यात 1,200 हून अधिक एमआरआय मशिन्स हेलियमवर अवलंबून आहेत.

बहुतांश मोठ्या रुग्णालयांचे आणि निदान केंद्रांचे वार्षिक मेंटेनन्स करार जीई, सिमेन्स किंवा फिलिप्ससारख्या कंपन्यांशी आहेत. त्यानुसार कच्च्या मालाच्या किमती वाढल्या, तरी रुग्णांवर किंवा हॉस्पिटल्सवर तातडीने आर्थिक बोजा पडत नाही. कंपन्या व्हेंडर नेमून त्याद्वारे मशिन्समधील हेलियमची पातळी कायम ठेवतात. मात्र, पुरवठाच झाला नाही तर वैद्यकीय क्षेत्राची चिंता वाढू शकते. कारण, एमआरआय मशिन्समध्ये हेलियम

40 टक्क्यांपेक्षा कमी झाल्यास कोट्यवधीचा सुपरकंडक्टर मॅग्नेट कायमचा निकामी होतो. या क्षेत्रातील माहीतगारांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 15 दिवसांपासून मेडिकल ग्रेड लिक्विड हेलियमपुरवठा ठप्प झाला आहे. कोरोना काळात जसा पुरवठा विस्कळीत झाला होता, तशीच स्थिती पुन्हा निर्माण झाली आहे. मशिनचे महागडे मॅग्नेट थंड ठेवण्यासाठी एका ‘थ—ी-टेस्ला’ एमआरआय मशिनला सुमारे 2,000 ते 3,500 लिटर हेलियम लागतो.

असे आले ‘हेलियम’चे संकट...

कतारमधील इराणच्या बॉम्बिंगमुळे उत्पादन ठप्प; 15 दिवसांपासून भारताचा पुरवठा खंडित

भारताची 80 टक्के गरज कतारवर अवलंबून; होर्मुझची सामुद्रधुनी खुली होऊनही पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता कमी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news