

श्रीकांत पाटील
दोनवडे (कोल्हापूर), पुढारी वृत्तसेवा : Kolhapur Flood : राधानगरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणाचे सातही दरवाजे उघडले होते. सायंकाळपासून पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. बालिंगे-दोनवडे दरम्यान पुन्हा पाणी येते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे भोगावती नदीकाठच्या गावात भीतीचे वातावरण पसरले.
कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील सोमवारी (दि. 29) सायंकाळपर्यंत पाणी होते. करवीरचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनी पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा करत महामार्ग सुरू केला. मंगळवारी (दि. 30) रात्री पावसाचा जोर वाढला. राधानगरी धरण परिसरात पावसाचा जोर वाढला. त्यामुळे भोगावती नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढत गेली. बुधवारी (दि. 31) सायंकाळीं बालिंगे-दोनवडे दरम्यान रस्त्याच्या बाजूला दोन फूटाच्या खाली पाणी पातळी होती. पण राधानगरी धरणातून विसर्ग होत असलेल्या पाण्याने पुलावर पाणी येण्याची परिस्थिती निर्माण झाली. हा पूल पुन्हा बंद होईल का? अशी चिंता नागरिकांना सतावत आहे.