AI Heart Diagnosis | हृदयविकाराचे निदान ‘एआय’द्वारे

कोल्हापुरात 16 महिन्यांत 38 हजार ईसीजी चाचण्या
 heart-disease-diagnosis-through- AI
AI Heart Diagnosis | हृदयविकाराचे निदान ‘एआय’द्वारेPudhari File Photo
Published on
Updated on

आशिष शिंदे

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्रांत एआय प्रणालीचा वापर करून हृदयविकाराचे निदान अत्यंत अचूक व त्वरित केले जात आहे. स्टेमी महाराष्ट्र प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात एप्रिल 2024 ते जुलै 2025 या 16 महिन्यांच्या कालावधीत हृदयविकाराची लक्षणे जाणवणार्‍या तब्बल 38 हजार 362 रुग्णांच्या ईसीजीची तपासणी केली. राज्य सरकारच्या या हायटेक तंत्रज्ञानाचा फायदा ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना होत असून, हृदयविकाराचे, तसेच मायोकार्डयिल इफ्राक्शन या गंभीर हृदयविकाराचे निदान केले जात आहे.

स्टेमी म्हणजे एसटी एलिव्हेशन मायोकार्डयिल इफ्राक्शन. हा हृदयविकाराचा अत्यंत गंभीर प्रकार मानला जातो. यामध्ये हृदयाला रक्तपुरवठा करणार्‍या कोरोनरी धमनीत ब्लॉकेज होते. ईसीजीमधील रेषांमध्ये (एसटी सेगमेंट एलिव्हेटेड) दोष दिसतो. अशी परिस्थिती आल्यास काही मिनिटांत हृदयाचे स्नायू कायमचे निकामी होण्याचा धोका असतो. हृदयविकाराशी संबंधित कोणतीही लक्षणे आढळल्यास शासकीय रुग्णालयात ही अत्याधुनिक निदान पद्धती वापरली जाते.

एआय अ‍ॅपद्वारे केले जाते निदान

रुग्णांना पूर्वी ईसीजी करून डॉक्टरपर्यंत रिपोर्ट पोहोचवायला वेळ लागत असे; पण आता एआयचा वापर करून हे निदान कार्डिओनेट अ‍ॅपच्या मदतीने थेट डॉक्टरांच्या मोबाईलवर काही मिनिटांत पोहोचते. ईसीजी मशिनला जोडलेली एआय प्रणाली ईसीजी रिपोर्ट स्कॅन करून त्यातील बदल झपाट्याने ओळखते. जर एसटी एलिव्हेशन आढळले, तर तत्काळ स्टेमी अलर्ट तयार होतो. यामुळे डॉक्टर त्वरित निर्णय घेऊन रुग्णाला कॅथ लॅबला पाठवतात.

स्टेमी प्रकल्पांतर्गत रुग्णांची केलेली ईसीजी तपासणी

कालावधी तपासलेले रुग्ण

एप्रिल 2024 ते मार्च 2025 15,285

एप्रिल 2025 ते जुलै 2025 23,077

हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी जाणवणारी लक्षणे

* छातीवर जाणवणारा दबाव, तसेच जबडा, मान, डावा खांदा, हाताकडे पसरत जाणारी वेदना

* दम, धाप लागणे * छातीत कळ, अस्वस्थता

* चक्कर, भोवळ येणे * घाम सुटणे, उलटी, मळमळ

जिल्ह्यातील 76 आरोग्य केंद्रांत प्रकल्प

जिल्ह्यातील 76 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ईसीजी मशिन बसवण्यात आले आहेत. स्थानिक आरोग्यसेवक रुग्णाचे ईसीजी काढतात आणि ते तत्काळ ऑनलाईन पाठवले जाते. कार्डिओनेट अ‍ॅपद्वारे तज्ज्ञ डॉक्टर हे रिपोर्ट पाहतात. यामुळे दूर खेड्यांतील रुग्णांनाही स्टेमीची लवकर ओळख होऊन त्वरित उपचार घेता येतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news