हातकणंगले पुरवठा विभागातील दोघे ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

अडीच हजार रुपये लाच स्वीकारताना कारवाई
Hatkanangle bribery case
हातकणंगले पुरवठा विभागातील दोघांना लाचप्रकरणी अटक
Published on
Updated on

हातकणंगले : हातकणंगले तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाकडील खासगी कॉम्प्युटर ऑपरेटर सुभाष मधुकर घुणके (वय 34, रा. घुणके मळा, यळगूड) व त्याचा सहकारी शैलेंद्र महादेव डोईफोडे (22, रा. सणगर गल्ली, पेठवडगाव) या दोघांना अडीच हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई शुक्रवारी झाली.

शासनाच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य कुटुंब योजनेत वरिष्ठांना सांगून नाव समाविष्ट केले आहे, असे सांगून संशयित घुणके याने तक्रारदाराकडे 4 हजार रुपयांची मागणी केली होती. या रकमेत कोणतीच तडजोड होणार नसल्याचे घुणके याने सांगितले होते. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. शुक्रवारी दुपारी येथील तहसील कार्यालय आवारात लाचलुचपत विभागाने सापळा रचला. यावेळी साक्षीदारांच्या समक्ष सुभाष घुणके व शैलेंद्र डोईफोडे याला 2,500 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. संशयितांच्या विरोधात हातकणंगले पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक वैष्णवी पाटील, प्रकाश भंडारे, विकास माने, संदीप काशीद, सचिन पाटील, उदय पाटील, प्रशांत दावणे यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news