

जयसिंगपूर : सांगली-कोल्हापूर बायपास महार्गावरील तमदलगे (ता. शिरोळ) येथील बिरदेव मंदिराजवळील चढावर मोटारसायकलवरून पडून अश्विनी रामचंद्र हापटे (वय 45, रा. शेतकरी संघाजवळ, हातकणंगले) ही महिला जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घटना घडली. याबाबतची नोंद रात्री उशिरापर्यंत जयसिंगपूर पोलिसांत झाली नव्हती.
अश्विनी हापटे व त्यांचा मुलगा सार्थक यांच्या मोटारसायकलवरून मिरज येथील नातेवाईकांकडे जात होते. यावेळी सांगली-कोल्हापूर बायपास महामार्गावरील तमदलगे येथील बिरदेव मंदिराजवळील असलेल्या गतिरोधकावर मोटारसायकल आल्यानंतर अश्विनी हापटे या मोटारसायकलवरून रस्त्यावर पडल्या. यावेळी त्यांच्या डोकीस गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. यावेळी डॉक्टरानी अश्विनी हापटे या मृत असल्याचे सांगितले. त्यानंतर शवविच्छदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या मागे पती, मुलगा असा परिवार आहे.