NCP Faction Unites: कोल्हापुरात 'दोन्ही' राष्ट्रवादी एकत्र! अपक्ष आमदारांविरोधात दाखवली राजकीय एकजूट

चंदगड नगरपंचायतीची आगामी निवडणूक ही राजर्षी शाहू विकास आघाडी या नावाने लढवली जाणार आहे.
NCP Faction Unites
NCP Faction UnitesPudhari photo
Published on
Updated on

NCP Faction Unites Kolhapur Politics:

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात एक मोठी राजकीय घडामोड पहायला मिळत आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही गट आता एकत्र आले आहेत. चंदगडमध्ये डॉ. नंदा बाभुळकर आणि माजी आमदार राजेश पाटील यांनी एकत्र येऊन आगामी निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. हा सर्व निर्णय मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला आहे.

NCP Faction Unites
Minister Hasan Mushrif | आयात आमदार म्हणणार्‍यांनी गडहिंग्लजचे वाटोळे केले; मंत्री हसन मुश्रीफ यांचा घणाघात

राष्ट्रवादीच्या या दोन्ही गटांनी आमदार शिवाजी पाटील यांच्या विरोधात ही राजकीय एकजूट केली आहे. चंदगड नगरपंचायतीची आगामी निवडणूक ही राजर्षी शाहू विकास आघाडी या नावाने लढवली जाणार आहे. गडहिंग्लज येथील पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीत या युतीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

यावेळी बोलताना नंदा बाभुळकर आणि राजेश पाटील यांनी आपण पुरोगामी विचारांमुळे एकत्र आलो असल्याचे स्पष्ट केले. माजी आमदार राजेश पाटील यांनी यावेळी एक मोठा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, काँग्रेस पक्षातील अनेक नेते आणि कार्यकर्ते लवकरच त्यांच्या आघाडीमध्ये सामील होणार आहेत.

NCP Faction Unites
Padalkar On Sharad Pawar: २०२६ मध्ये शरद पवार कसे निवडून येणार...? १० आमदारांची राष्ट्रवादी म्हणत पडळकरांनी काढला चिमटा

मुश्रीफ यांची भूमिका

हसन मुश्रीफ यांनी देखील या एकजुटीवर समाधान व्यक्त करत, "आमच्या या एकजुटीमुळे नगरपंचायत निवडणुकीत चांगला विजय होईल. तसेच, आमच्यासोबत युती करण्यासाठी अजून काही नेते तयार आहेत," असे पत्रकार परिषदेत जाहीर केले.

राज्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तीव्र विरोध असताना, कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमध्ये मात्र हे दोन्ही गट एकत्र येऊन स्थानिक निवडणूक लढवत आहेत. ही कोल्हापुरातील राजकारणाची पहिली बातमी ठरली आहे, जिथे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news