Hasan Mushrif : शोभाताई फराकटे व संभाजी फराकटे यांना विजयी करणे हीच अजितदादा व गणपतराव फराकटे यांना श्रद्धांजली

मंत्री हसन मुश्रीफ; बोरवडेत महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ विराट जाहीर सभा
Hasan Mushrif
Hasan Mushrif
Published on
Updated on

बोरवडे : बोरवडेचे सुपुत्र दिवंगत गणपतराव फराकटे यांनी बिद्री- बोरवडे परिसरातील जनतेला आपले कुटुंब मानून त्यांच्यावर जीवापाड प्रेम केले. सामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या उन्नतीसाठी ते आयुष्यभर झिजत राहिले. त्यांच्या पश्चात कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून श्रीमती शोभाकाकी गणपतराव फराकटे यांना जिल्हा परिषदेवर निवडून देण्यासाठी प्रयत्न करावेत. शोभाकाकींचा विजय हीच स्वर्गीय अजितदादा पवार व स्वर्गीय गणपतराव फराकटे यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी भावनिक साद वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी घातली.

बोरवडे (ता. कागल) येथे बोरवडे जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार शोभाताई गणपतराव फराकटे, बोरवडे पंचायत समितीचे उमेदवार संभाजी साताप्पा फराकटे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विजयमाला मगदूम होत्या. शाहू ग््रुापचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले, कागलात विधायक कामांसाठी आम्ही तिघेही महायुतीच्या झेंड्याखाली एकत्र आलो आहोत. भविष्यातही आम्ही तिघे एकत्रच राहणार आहोत. महापालिका, नगरपालिकांच्या पाठोपाठ आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतही महायुतीच जिंकेल.

गोकुळ दूध संघाचे संचालक अंबरिषसिंह घाटगे म्हणाले, संघर्षामुळे काहीही चांगले होणार नाही. त्यामुळेच आम्ही सर्वजण एकत्र आलो आहोत. कार्यकर्त्यांनी मनातील किंतु- परंतु काढून टाकत भविष्यातही एकत्रित येऊन काम करण्याची तयारी ठेवावी. मागील काही काढू नका. काहीजणांना चांगलं बघवत नाही. त्यांच्यापासून सावध राहा. बिद्री साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन मनोज फराकटे म्हणाले, आपल्या पाच वर्षांच्या कालावधीत आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सार्वजनिक आणि वैयक्तिक लाभाच्या योजना घरोघरी पोहोचवल्या आहेत. युतीतील सर्व घटक पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा आपल्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. युतीचे उमेदवार मताधिक्याने निवडून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहे.

यावेळी देवानंद पाटील, सत्यजित पाटील-सोनाळीकर, डॉ. महादेव साठे, विजय काळे, रणजीत कांबळे, बाळासाहेब फराकटे, भूषण लाड, नेताजी कांबळे, युवराज गायकवाड, राजश्री साठे, दिव्यांजली परीट यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप ऊर्फ भैया माने, गोकुळ दूध संघाचे चेअरमन नवीद मुश्रीफ, संचालक अंबरिष घाटगे, सुनीलराज सूर्यवंशी, भूषण पाटील, दिनकर कोतेकर, केशव पाटील, डी. एम. चौगले, प्रताप पाटील, आनंदा साठे, ज्ञानदेव फराकटे, जयदीप पोवार, रघुनाथ कुंभार, बाळासो वारके, अण्णासो पोवार, रावसो खिल्लारी, सरपंच जयश्री फराकटे, सुनील मगदूम, उपसरपंच दत्तात्रय पाटील आदी उपस्थित होते. रघुनाथ कुंभार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अशोक कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. उमेदवार संभाजी फराकटे यांनी आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news