Hasan Mushrif | सतेज, महाडिक यांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न : मुश्रीफ

आम्ही महायुती म्हणून लढणार
Minister Hasan Mushrif
मंत्री हसन मुश्रीफ(File photo)
Published on
Updated on

कोल्हापूर : आमदार सतेज पाटील, आमदार अमल महाडिक यांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न, आम्ही मात्र, महायुती म्हणूनच लढणार असे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी ते बोलत होते.

काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील व त्यांचे पारंपरिक आणि कट्टर प्रतिस्पर्धी आमदार अमल महाडिक हे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांबाबत वक्तव्ये करत आहेत. त्यातून ते एकत्र येण्याबाबतची चर्चाही सुरू आहे. याबाबत विचारता मुश्रीफ म्हणाले, या दोघांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही मात्र, महायुती म्हणूनच गोकुळची निवडणूक लढवणार आणि ती जिंकणार. गोकुळवर महायुतीचीच सत्ता येणार. निवडणुकीबाबत लवकरच आम्ही एकत्र बसून, त्यावर चर्चा करू असे सांगितले.

शिवाजी पाटील सध्या शांत आहेत; दाव्यासाठी 8 दिवसांची मुदतवाढ

शिवाजी पाटील यांच्याबद्दल विचारता ते विधानसभेचे आमदार आहेत. आमचे सहकारी आहेत. त्यांच्या काही भावना होत्या, त्या भडकल्या होत्या. त्यामुळे ते बोलले असतील; पण ते आता कुठलेही वक्तव्य करत नाहीत? सध्या ते शांत आहेत, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, असेही मुश्रीफ म्हणाले. आपण त्यांना बदनामीच्या दाव्याची दहा दिवसांची मुदत दिली होती. ती आता संपत आली आहे, अशी विचारणा करता मी त्यांना आणखी पुढील आठ दिवसांची मुदत वाढवून देतो असेही मुश्रीफ यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news